जन आक्रोश समिती आक्रमक; तोपर्यंत अन्य कोणताही हायवे कोकणात बनवू नये
गुहागर, ता. 16 : पनवेल ते इंदापूर ७९ किलोमीटरचा हायवे बनवायला सतरा वर्षे लागली, इंदापूर पासून ऊरलेला हायवे बनवायला बारा वर्षे लागली. राहीलेला अपूर्ण महामार्ग पूर्ण करण्यासा अजून किती वर्ष लागतील कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळ जोपर्यंत मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होत नाही तोपर्यंत अन्य कोणताही हायवे कोकणात बनवू नये. असे परखड मत जनआक्रोश समितीने मांडले आहे. स्वातंत्र्य दिनापासून महामार्ग पूर्णत्वास नेण्यासाठी जनआक्रोश समितीच्या कार्यकर्त्यांनी माणगाव येथे आमरण उपोषण सुरु केले आहे. Jan Akrosh Committee workers on hunger strike
आमरण उपोषणाच्या निमित्ताने जनआक्रोश समितीचे अध्यक्ष अजय यादव, सचिव रुपेश दर्गे आणि संजय यादवराव मुख्य समन्वयक स्वराज्य भूमि आंदोलन या तिघांनी प्रसिध्दी पत्रक काढले. त्यामध्ये मुंबई गोवा महामार्गाबाबत अनेक मागण्या केलेल्या आहे. या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, नव्याने जमीन विकत घेऊन पाचशे किलोमीटरचा समृद्धी हायवे पाच वर्षात बांधून पूर्ण झाला पण पूर्वीच्या हायवेवर फक्त वाढवायचा असताना कोकण महामार्गाला 17 वर्षे लागली. महाराष्ट्राच्या अन्य भागातील हायवे एकाहून एक सुंदर बनत असताना कोकणचा हायवे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्षित आहे अशी येथील जनतेची भावना झाली आहे. पुढील वर्षभरात युद्धपातळीवर हा हायवे बांधून पूर्ण व्हावा ही या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. याबरोबरच हा हायवे बांधताना अनेक चुका झाल्या आहेत धोकादायक वळणे तशीच आहेत सर्विस रोड नाही मातीचे डोंगर फोडल्यामुळे परशुराम मंदिर आणि पेढे परशुराम सारखी गावे धोक्यात आली आहेत, भोसते घाट सारखे धोकेदायक वळणे तशीच आहेत, शाळेतल्या विद्यार्थ्यांना गावकऱ्यांना पलीकडे जाण्यासाठी अंडरपास आवश्यक आहेत, गावातील रस्ते थेट हायवेवर येतात यामुळे असंख्य निष्पाप माणसे एक्सीडेंट मध्ये मारली जातात. सुरक्षेच्या दृष्टीने या हायवे मध्ये असंख्य चुका आहेत त्यामुळे भविष्यात खूप लोक मारले जाणार आहेत या चुका तातडीने सुधारला पाहिजे. हा हायवे पुढील वर्षभरात पूर्ण झाला पाहिजे. सुरक्षित झाला पाहिजे. Jan Akrosh Committee workers on hunger strike
छत्रपती शिवराय, लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर, वासुदेव बळवंत फडके, नाशिकचे राणी खूप सारे राष्ट्रपुरुष कोकणातले आहेत आणि म्हणून या हायवेला स्वराज्य भूमी कोकण महामार्ग नाव द्यावे आणि त्या त्या गावांच्या जवळ हायवेवर त्या त्या राष्ट्रपुरुषाची प्रेरणा केंद्र बनवावीत ही मागणी या उपोषणात आपण करत आहोत. Jan Akrosh Committee workers on hunger strike
माणगाव बायपास इंदापूर बायपास युद्धपातीवर अशा महत्त्वाचे विषय पूर्ण व्हायला हवेत , कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही अशी कारण यापुढे सांगू नयेत. कॉन्ट्रॅक्ट मध्ये झाडे लावण्याची प्रोव्हीजन असताना कोणती झाडे सतरा वर्षाची हायवेवर लावली नाही पण होती ती तोडली. या हायवेवर कोकणातील समृद्ध जैवविविधता दाखवणारी सह्याद्रीतली सर्व प्रकारची झाडे लावावी आणि हा जगातील सर्वोत्तम बायोडायव्हर्सिटी हायवे बनवावा. जोपर्यंत हा हायवे पूर्ण होत नाही आणि सुरक्षित होत नाही तोपर्यंत ग्रीनफिल्ड हायवे सहित इतर कोणताही हायवे कोकणात सुरू करू देणार नाही. अशा स्वरूपाचा निर्धार जनआक्रोश समितीने यावेळी व्यक्त केला. Jan Akrosh Committee workers on hunger strike
दरवर्षी गणपती आणि शिमग्याला कोल्हापूर मार्गे कोकणात जा आमच्या या जगातल्या सर्वात सुंदर देवभूमीत आम्हाला स्वतःचा रस्ता नाही यासारखे अन्य कोणते दुर्दैव नाही. त्यामुळे गणपती मध्ये सर्व हायवे ड्रायव्हिंग साठी योग्य करून आम्हाला कोकणातूनच जाण्याची व्यवस्था करावी. कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः या आंदोलनाची दखल घ्यावी, या आंदोलनाच्या समितीशी चर्चा करून भविष्यातील कोकण महामार्गाचे भवितव्य माननीय मुख्यमंत्र्यांनी कोकण वाशी यांना सांगावे असा आग्रह उपोषणकर्त्या आंदोलकांचा आणि जन आक्रोश समितीचा आहे. Jan Akrosh Committee workers on hunger strike
सर्वसामान्य कोकणातल्या तरुणांनी आणि जनतेने जन आक्रोश समितीच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू केले आहे. सचिव रुपेश दर्गे, सुरेंद्र पवार आणि संजय जंगम. हे आमरण उपोषणासाठी यावेळी बसले आहेत. समितीचे अध्यक्ष अजय यादव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. स्थानिक नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, परीक्षा संघटनेचे अध्यक्ष संजय अण्णा साबळे, समृद्ध कोकण संघटनेचे अध्यक्ष आणि स्वराज्य भूमी अभियानाचें प्रमुख संजय यादवराव हे या आंदोलनात सहभागी झाले आहेत, मावळा प्रतिष्ठान, कुणबी संघटना रायगड जिल्हा रामनवमी संघटना बजरंग दल छावा संघटना अशा अनेक संघटना या आंदोलनात सहभागी झाले आहेत. Jan Akrosh Committee workers on hunger strike