57 बैलजोड्यांचा सहभाग, श्री सुकाई देवी देवस्थानचे आयोजन
गुहागर, ता. 08 : तालुक्यातील तळवली येथे श्री सुकाईदेवी ग्रामदेवता देवस्थान तळवली यांच्यावतीने नुकत्याच पार पडलेल्या सामूहिक गावठी बैल नांगरणी स्पर्धेत सप्तेश्वर चंडिका देवघरने प्रथम क्रमांक पटकावला. तर केदार चंडिका बोरगाव यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. Plowing competition at Talwali
सदर स्पर्धा ही श्री सुकाईदेवी ग्रामदेवता मंदिर तळवली येथे गावठी बैलजोडीसाठी घेण्यात आली होती. यामध्ये सचिन मराठे निर्व्हाळ यांची बैलजोडी तृतीय, तिर्थक बागकर तळवली यांची बैलजोडी चतुर्थ, भैरी लिंगुबाई पाथर्डी पंचम, सावी उमेश चव्हाण काजळी षष्ठ, मोहन कदम शिरवली सप्तम, संभाजी लांजेकर झोंबडी अष्टम तर गणेश मित्र मंडळ देवखेरकी व शैलेश पवार तळवली यांच्या बैलजोड्यांना विशेष सुंदर बैलजोडी म्हणून गौरविण्यात आले. स्पर्धेतील प्रथम क्रमांकास रोख रु.7 हजार व चषक, द्वितीय क्रमांकास रोख रु. 6 हजार व चषक, तृतीय क्रमांकास रोख रु. 5 हजार व चषक, चतुर्थ क्रमांकास रोख रु. 4 हजार व चषक, पंचम क्रमांकास रोख रु. 3 हजार व चषक, शष्ट क्रमांकास रोख रु. 2 हजार व चषक, तसेच सप्तम, अष्टम व विशेष सुंदर जोडी यांना रोख रु.1 हजार व चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत सहभाग घेतलेल्या प्रत्येक बैल जोडी मालकाला सहभाग प्रमाणपत्र व पंच्या देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेचे सूत्रसंचालन वैभव पवार यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी श्री सुकाई देवी ग्रामदेवता कमिटी व ग्रामस्थांनी मेहनत घेतली. Plowing competition at Talwali