आरजीपीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कुमार तखेले यांनी केले विद्यार्थ्यांचे अभिनंदन
गुहागर, ता. 03 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीतील बाल भारती पब्लिक स्कूलच्या वतीने मैत्री क्लब आरजीपीपीएल येथे प्रशालेचे मुख्याध्यापक सुरजीत चटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी पदभार समारंभ पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी आरजीपीपीएल कंपनीचे व्यवस्थापक संतोष कुमार तखेले, संजना महिला क्लबच्या अध्यक्षा सौ. सीमा तखेले, आरजीपीपीएलचे एजीएम, एचआर श्री. स्नेहसिस भट्टाचार्य, केएलएलचे प्रमुख श्री. एस. पी. रेड्डी, श्रीमती रमा रेड्डी, ऑपरेशन अँड मेंटेनन्स एमआर डीजीएम श्री. सैजू , श्रीमती नीथू, सीनियर, व्यवस्थापक सिव्हिल आरजीपीपीएल श्री बबल जेफरी , श्रीमती अनुरुपा चटर्जी, श्री. रेजी कुमार, श्रीमती मीना खानविलकर आदी उपस्थित होते. Ceremony of Bal Bharti Public School
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती वंदनेच्या नृत्य आविष्काराने स्कूलच्या विद्यार्थींनीनी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक सुरजीत चटर्जी यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी इयत्ता दुसरीच्या वर्गातून उत्तम विद्यार्थी कु.नील परब आणि विद्यार्थिनी कु. प्रिया कुमारी, इयत्ता तिसरीच्या वर्गातून उत्तम विद्यार्थी कु. स्तव्य तवसाळकर आणि विद्यार्थिनी कु. रिद्धी खानविलकर व चौथीच्या वर्गातून उत्तम विद्यार्थी कु. ओम शेटे आणि विद्यार्थिनी कु. उर्वी बावधनकर, पाचवीच्या वर्गातून उत्तम विद्यार्थी कु. श्लोक देसाई आणि विद्यार्थिनी कु.शाल्मली काळे, सहावीच्या वर्गातून उत्तम विद्यार्थी कु.तनिष राहटे आणि विद्यार्थिनी कु. शुभिका गेडाम, सातवीच्या वर्गातून उत्तम विद्यार्थी कु. नैतिक कुमार आणि विद्यार्थिनी कु. आर्या जाधव, आठवीच्या वर्गातून उत्तम विद्यार्थी कु. मेधांश चटर्जी, विद्यार्थिनी कु. मालविका एम एस, नववीच्या वर्गातून उत्तम विद्यार्थी कु. वेदांत पालकर आणि विद्यार्थिनी कु.स्वरा मोरे, दहावीच्या वर्गातून उत्तम विद्यार्थी कु. मिहीर कचरेकर आणि विद्यार्थिनी कु.सई पेडणेकर यांची निवड केल्यानंतर विद्यालयाचा मुख्य विद्यार्थी म्हणून कु. अर्णव तोडकरी आणि विद्यार्थिनी कु. माही शाह तसेच उपमुख्य विद्यार्थी कु. ऋषिकेश सानप आणि विद्यार्थिनी कु.समृद्धी मोरे यांची निवड तर स्पोर्ट कप्तान कु. अब्दुल्ला मालाणी व कु. अंशू कुमारी यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर कल्चर सेक्रेटरी कु.सर्वेश बळवंत व कु. नंदिता बाला तसेच विद्यालयाच्या गोदावरी हाऊसचे कप्तान कु. वेदांत निवाते व कु. श्रेया पवार, उपकप्तान कु. सक्षम लखनपाल व कु. ईश्वरी संसारे, कृष्णा हाऊसचे कप्तान कु.स्मित चव्हाण व कु. आयेशा खतीब, उपकप्तान कु. वरद फुणगुस्कर व कु. प्रियदर्शिनी राव, सावित्री हाऊसचे कप्तान कु. प्रणव माने व कु.साची फुलझेले, उपकप्तान कु.ओमसाई विचारे व कु. नोरा वर्गीस, वशिष्ठी हाऊसचे कप्तान कु. स्नेह वेल्हाळ व कु. अक्षरा राणे उपकप्तान कु. केतन शिंदे व हुमैरा खान यांची निवड करण्यात आली. Ceremony of Bal Bharti Public School
आरजीपीपीएल कंपनीचे व्यवस्थापक श्री. संतोष कुमार ताखेले यांनी विद्यार्थी पदभार समारंभाच्या उत्तम व्यवस्थेचे कौतुक केले आणि सर्व पदभार स्वीकारलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे आणि जबाबदारीच्या भावनेने पार पाडल्या जाणाऱ्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्याची जाणीव करून दिली. विद्यार्थ्यांना नेतृत्वाची प्रेरणा दिली. विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. Ceremony of Bal Bharti Public School
प्रशालेच्या शिक्षिका सौ. प्राची कलगुटकर यांनी सर्वांचे आभार मानले. मुख्य विद्यार्थिनी कु. माही शाह हिनेही आपले मनोगत व्यक्त केले. मुख्य विद्यार्थी कु.अर्णव तोडकरी समवेत विद्यार्थ्यांनी शपथ ग्रहण केली. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. सुरजीत चटर्जी, प्रिफेक्टोरियल बोर्ड, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. Ceremony of Bal Bharti Public School