गुहागर, ता. 03 : शहरातील भाजपचे युवा कार्यकर्ते संजय मालप यांची भाजप जिल्हा ओबीसी उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीचे नियुक्तीपत्र बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले. Sanjay Malap BJP District OBC Vice-President
संजय मालप हे यापूर्वी भाजपचे गुहागर तालुका युवक अध्यक्ष, तसेच स्वीकृत नगरसेवक होते. शहरातील सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निवडीनंतर गुहागर भाजप शहर व जांगळेवाडी तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. Sanjay Malap BJP District OBC Vice-President
यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांच्या मार्फत भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा कार्यकारणी नियुक्ती पत्र देण्यात आले. संजय मालप (जिल्हा उपाध्यक्ष ), संकेत हुमणे (जिल्हा सरचिटणीस), नाना पालकर (जिल्हा सरचिटणीस), अनिल वणे (जिल्हा सरचिटणीस) यांना नियुक्तीपत्र देण्यात आली. Sanjay Malap BJP District OBC Vice-President