रत्नागिरी, ता. 01 : दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजपाच्या ओबीसी सेल जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते भाई जठार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वयंवर मंगल कार्यालय येथे आयोजित भाजपाच्या मेळाव्यात श्री. जठार यांचा सत्कार राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांनी त्यांचा सत्कार केला. BJP OBC cell district president Bhai Jathar
ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मेहनत घेणार असल्याचे प्रतिपादन भाजपाचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष भाई जठार यांनी केले. श्री. जठार यांनी दिवंगत खासदार, लोकनेते शामराव पेजे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कामाला सुरवात केली आहे. श्री. जठार हे 1998 पासून ते राजकारण, समाजकारणात कार्यरत आहेत. तसेच ते भाजपामध्ये अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. ते लांजा तालुकाध्यक्ष होते, सध्या लांजा तालुका
प्रभारी आहेत. याशिवाय दिलासा ट्रस्ट, भाई जठार मित्रमंडळाचे पदाधिकारी आहेत.हातखंबा, निवळी परिसरामध्ये महामार्गावर होणाऱ्या अपघातग्रस्तांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करणे, अपघात झाल्यास जखमींना ताबडतोब मदतीसाठी ते धावून जातात. सर्वसामान्यांचे नेते म्हणून ते लोकप्रिय आहेत. BJP OBC cell district president Bhai Jathar
भाई जठार यांनी माळनाका येथे लोकनेते कै. शामराव पेजे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यावेळी राजीव कीर, संतोष बोरकर, नीलेश आखाडे, डॉ. ऋषिकेश केळकर, नीलेश आखाडे, गुरुप्रसाद फाटक, राजू भाटलेकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. BJP OBC cell district president Bhai Jathar