नगरपंचायत सुस्त, नागरिकांची गैरसोय, तक्रारींकडे दुर्लक्ष
गुहागर, ता. 27 : पर्यटकांचे माहेरघर ओळखले जाणारे गुहागर शहर पूर्णतः अंधारात आहे. पथदीप बंद असल्याने नागरिकांना अंधारातून मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असून नगरपंचायत सुस्त असल्याचे दिसून येत आहे. Guhagar city in the dark without streetlights
लांब लचक समुद्रकिनारा, नयनरम्य निसर्ग, आजुबाजूची प्रेक्षणीय स्थळे यामुळे गुहागर पर्यटनात्मकदृष्ट्या महाराष्ट्रातील पर्यटन केंद्रबिंदू म्हणून नावारुपाला येत आहे. हजारो पर्यटक गुहागरमध्ये पर्यटनाला येतात आणि येथील निसर्ग पाहून भारावून जातात. मात्र, पर्यटकांचे गुहागर शहर आज अंधारात चाचपडत आहे. शहरातील पथदीप बंद आहेत. पोलीस ठाणे परिसर, मुख्य नाका भागात पथदीप बंद आहेत. Guhagar city in the dark without streetlights
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. रस्त्यावर पाणीच पाणी असते. त्यातच खड्डे पडलेले असतात. अशावेळी अंधार पडल्यावर व रात्री रस्त्यावरुन चालणे नागरिकांना कठीण जात आहे. शहराच्या मुख्य रस्त्यावरील काळाकुट्ट काळोख नागरिकांना भयभीत करतो. चौपाटीवरील दिवेही बंद आहेत. अंधार पडल्यावर चौपाटीवर एखादा अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे. गुहागरला अलिकडे पावसाळी पर्यटनही वाढले आहे. त्यामुळे पर्यटक अधूनमधून येथे येतात. अशावेळी चौपाटीवर व शहराच्या मुख्य रस्त्यावर पथदीप नसल्यास त्यांनाही अवघडल्यासारखे वाटते. त्यामुळे गुहागरचे नाव खराब होत आहे. नगरपंचायतीने लक्ष घालून पथदीप सुरु करावेत, अशी मागणी होत आहे. Guhagar city in the dark without streetlights