• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर लायन्स क्लब तर्फे विद्यार्थ्यांचा गौरव

by Ganesh Dhanawade
July 27, 2024
in Guhagar
148 2
0
Students honored by Guhagar Lions Club

पाटपन्हाळे विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविताना

291
SHARES
831
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 27 : लायन्स क्लब ऑफ गुहागरतर्फे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयातील नवोदय परीक्षा,  इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा, एनएमएमएस परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. Students honored by Guhagar Lions Club

Students honored by Guhagar Lions Club
पाटपन्हाळे विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविताना

पाटपन्हाळे विद्यालयातील श्री शिवछत्रपती सभागृहात पार पडलेल्या या सत्कार कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू , कॅडबरी चॉकलेट व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. डॉ.अनिकेत गोळे, माजी अध्यक्ष ला. संतोष वरंडे, ला. शामकांत खातू, उपाध्यक्ष ला. सचिन मुसळे, सचिव ला. मनिष खरे, खजिनदार ला. माधव ओक, ला. ओंकार संसारे,  ला. विनोद पटेल, ला. शैलेंद्र खातू, पाटपन्हाळे विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. डी. पाटील, ज्येष्ठ शिक्षिका एस.एस. चव्हाण , प्रा. एस. एस. मोरे, शिक्षक एस. वाय. भिडे, एस. एम. आंबेकर आदी उपस्थित होते. Students honored by Guhagar Lions Club

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयातील नवोदय परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी कुशल वैभवकुमार पवार, इयत्ता पाचवी  शिष्यवृत्तीधारक कुशल वैभवकुमार पवार व सिद्धार्थ अशोक पाष्टे, इयत्ता आठवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी समृद्धी सुरेश आंबेकर व मृण्मयी दत्ताराम जाधव, एनएमएमएस ( आर्थिक मागासवर्ग ) शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी मृण्मयी दत्ताराम जाधव या गुणवंत विद्यार्थ्यांचा लायन्स क्लब गुहागरतर्फे सत्कार करण्यात आला. Students honored by Guhagar Lions Club

यावेळी बोलताना माजी अध्यक्ष संतोष वरंडे यांनी गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून लायन्स क्लब गुहागरतर्फे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण आदी क्षेत्रातील उपक्रम राबविले जातात याची माहिती दिली. अध्यक्ष ला. डॉ. अनिकेत गोळे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्याकरिता गुणगौरव कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले.  Students honored by Guhagar Lions Club

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarStudents honored by Guhagar Lions ClubUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share116SendTweet73
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.