• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 July 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

डासांची उत्पत्ती ३० दशलक्ष वर्षांपूर्वीची

by Guhagar News
July 17, 2024
in Articals
69 0
1
डासांची उत्पत्ती ३० दशलक्ष वर्षांपूर्वीची
135
SHARES
386
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

Guhagar news : पृथ्वीवर डासांची उत्पत्ती ३० दशलक्ष वर्षांपूर्वी झाली आहे आणि पृथ्वीवर मानवी संस्कृती निर्माण होऊन अवघी सहा हजार वर्षे झाली आहेत. जगामध्ये ‘आईसलँड’हा एकमेव देश असा आहे जो डासमुक्त देश आहे. डासांच्या पृथ्वीवर ३७०० जाती आहेत. यापैकी माणसांना त्रास देणार्‍या व संसर्ग पोहोचविणार्‍या जाती केवळ सहा आहेत. या जातींपैकी नर डास माणसाला फारसे चावत नाहीत माणसाला चावतात त्या माद्या. नर डासाचे आयुष्य १० ते १२ दिवसाचे असते आणि मादी डासाचे आयुष्य  ४२ ते ६० दिवस असते. Origin of mosquitoes

डासांच्या आयुष्याचा कालावधी पाहता त्यातही माद्या नरांना वरचढ आढळतात.अंडी घालण्यासाठी डासाला जी प्रथिने हवी असतात,ती माणसाच्या रक्तातून सहजपणे मिळू शकतात म्हणून या माद्या माणसांना चावतात.डासांची मादी दोन महिन्यांच्या आयुष्यात किमान तीन वेळा अंडी घालते प्रत्येक वेळा ती ३०० अंडी घालते.म्हणजे डासांची एक मादी एक हजार नवे डास जन्माला घालत असते.एखादी डासाची मादी डेंग्यू किंवा झिकासारख्या आजाराने बाधित व्यक्तीला किंवा जनावराला चावते,ते विषाणू मादीत प्रवेश करतात.आठ ते दहा दिवसानंतर ही मादी अन्य माणसाला चावली तर त्यामुळे त्या व्यक्तीला संसर्ग होऊ शकतो.देशभरात ‘झिका’चा प्रसार होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना नुकत्याच केंद्र सरकारने जारी केल्या आहेत.केवळ महाराष्ट्राचा विचार केला तर गेल्या काही दिवसात ‘झिका’चे आठ रूग्ण आढळून आले आहेत.त्यापैकी सात पुण्यामध्ये व एक कोल्हापूरमध्ये आढळून आला आहे.दुसरीकडे डेंग्यूच्या रूग्णांची संख्या पावसाळ्यामुळे वाढताना दिसत आहे.या आजाराच्या लक्षणांमध्ये बदल होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.याचाच अर्थ डेंग्यूच्या विषाणूंमध्ये म्युटेशनने बदल होत आहे,असा लावला जात आहे. ‘आईसलँड’ हा एकमेव देश आजमितीस जगात डासमुक्त का आहे याचा अजून शोध लागलेला नसला तरी वातावरणातील बदल व जागतिक तापमानवाढीमुळे या देशातही डासांची उत्पत्ती सुरू होण्याची भीती आता संशोधकांना वाटत आहे. Origin of mosquitoes

डासांचा बंदोबस्त करण्यासाठी टेनिस रॅकेटपासून रिपेलंटपर्यंत अनेक गोष्टी बाजारात उपलब्ध असून त्यांचा वापरही मोठ्या प्रमाणात करण्यात येत असला तरी डास पूर्णपणे नष्ट होऊ शकलेले नाहीत.डास मारण्यासाठी अगरबत्ती लावली तरी डास मरत नाहीत,कारण पहिल्या टप्प्यात या अगरबत्तीच्या धुराने डास बेशुद्ध होतात; पण खोलीत हवा खेळती असेल,तर धुराची घनता कमी होऊन प्राणवायू मिळाला की,बेशुद्ध झालेले डास पुन्हा शुद्धीवर येतात. रिपेलंटमध्ये विषारी रसायने असतात आणि दारे- खिडक्या बंद करून रिपेलंट लावल्यास त्याचा माणसांना त्रास होऊ शकतो आणि त्रास होऊ नये म्हणून दारे- खिडक्या उघड्या ठेवल्या तर डास पळून जातात. संसर्ग हा भाग वेगळा. माणसाच्या शरीराच्या एक चौरस इंचावर ६८० डास एका वेळी चावले,अशा पद्धतीने संपूर्ण शरीरभर डास चावले तरच माणसाचा  मृत्यू ओढवण्यासारखा प्रकार घडू शकतो; पण प्रत्यक्षात तसे कधी घडत नाही. Origin of mosquitoes

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarOrigin of mosquitoesUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share54SendTweet34
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.