गुहागर तालुका औद्योगिक बहुउद्देशीय सहकारी संस्था गुहागर
गुहागर, ता. 15 : तालुका औद्योगिक बहुउद्देशीय सहकारी संस्था गुहागर संस्थेचे काम अखंडपणे चालू राहण्यासाठी एक कार्यालयीन कर्मचारी नेमण्याचे सर्व संचालकांचे वतीने ठरविण्यात आले. व अशी संधी गरीब व होतकरू विद्यार्थी अथवा विद्यार्थिनीला देण्यात यावी असे एकमताने ठरविण्यात आले. सदर निवड झालेल्या विद्यार्थी अथवा विद्यार्थिनीला तिचे कॉलेज वेळ पूर्ण झालेनंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाज सांभाळावे व फावल्या वेळात अभ्यास करावा जेणेकरून संस्था जे काही मानधन देईल त्या स्वकष्टावर आपले शिक्षण पूर्ण करता येईल. Earn and learn
अनेक वर्ष कार्यरत असून संस्था स्थापनेपासून शासन आणि सर्व आजपर्यंत निवडून आलेले सर्व संचालक यांनी आपल्या परीने वाढविली व जोपासली. सदर संस्थेचे कामकाज पाहण्यासाठी पूर्वी शासकीय सचिव हे पद होते मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या शासन निर्णयानुसार हे पद शासनाने वर्ग करून सर्व जबाबदारी संस्थेकडे सोपविली. संस्थेला पूर्णवेळ सचिव नेमणूक करणेसाठी आवश्यक पूर्तता आणि पात्रता उमेदवार मिळेपर्यंत संस्थेच्या संचालिका सौ. शलाका ताई काष्टे यांची मानद सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली. Earn and learn
यासाठी वरिष्ठ महविद्यालय पाटपन्हाळे यांनाही संस्था लेखी पत्रव्यवहार करून विनंती करणार असून अशा पद्धतीने काम करू इच्छिणाऱ्या गरीब व होतकरू विद्यार्थी अथवा विद्यार्थिनीनी संस्थेच्या मानद सचिव सौ. शलाका ताई काष्टे शृंगारतळी मो नं.९४२१२३१९१८ या क्रमांकावर दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत फोन करून आपले अर्ज सादर करावेत . सादर झालेल्या अर्जांमधून संस्थेमार्फत मुलाखत घेवून योग्य त्या उमेदवाराची नेमणूक केली जाईल असे संस्थेचे सर्व संचालक व अध्यक्ष Adv. सुशील सुगंधा गणपत अवेरे यांनी केले आहे. Earn and learn