गुहागर, ता. 14 : तालुक्यातील जानवळे येथील जावेद फाकीर वनू ( ३७) या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १२ जून रोजी घडली. Youth commits suicide in Janwale
जानवळे येथील जावेद हा त्याच्या घराशेजारी असणाऱ्या जुन्या घरामध्ये झोपायला गेला होता. सकाळी १० वा. त्याचा पुतण्या फरहान आदिल वनू हा त्याची गाडी घेण्यासाठी गेला असता मयत जावेद याच्या खोलीचा दरवाजा उघडा दिसला. त्यामुळे फरहान याने दरवाजातून डोकावले असता जावेद हा गळफास लावून लटकलेला असल्याचे दिसून आले. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. Youth commits suicide in Janwale