गुहागर, ता. 14 : बिटकॉईन व क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास भाग पाडत गुहागर देवघर येथील शाम शंकर पेवेकर या सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याची एकूण ६६ हजार ३१७ इतक्या रक्कमेची ऑनलाईन फसवणूक झाल्याची तक्रार गुहागर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. Online fraud of bank employee
दि. २८ फेब्रुवारी ते ७ जून २०२४ दरम्यान जितीन, थॉमस रॅनडेंनी या नावाच्या इसमांनी संगणकीय साधनांचा वापर करून इंटरनेट जनरेटेड क्रमांकाद्वारे पेवेकर यांच्याशी वारंवार संपर्क साधत ते ब्रोकर असल्याचे भासवले. संभाषणातून पेवेकर यांचा विश्वास त्यांनी संपादन केला. त्यांना बिटकॉईन व क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास भाग पाडले. पेवेकर यांनी चिपळूण येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून १७ एप्रिल २०२४ रोजी १६,३७१ रुपये, तर ५ जून २०२४ रोजी फिरोज खान नामक व्यक्तीच्या खात्यावर ३ व्यवहाराद्वारे ५० हजार रुपये ट्रान्सफर केले. मात्र यानंतर या व्यक्तींनी सर्व माध्यमातून संपर्क बंद केला. पेवेकर यांनी तशी फिर्याद गुहागर पोलीस ठाण्यात दिली. Online fraud of bank employee