गुहागर, ता. 13 : गुहागर पंचायत समिती आरोग्य विभागाच्या तालुका नर्सिंग अधिकारी म्हणून सेवेत असलेल्या श्रीमती संध्या वामन खैरे यांचा सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा नुकताच श्री पुजा मंगल कार्यालय पाटपन्हाळे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी जिल्ह्यातील अनेक नामवंत डॉक्टरांची उपस्थिती होती. या सर्वांनी तालुका नर्सिंग अधिकारी श्रीमती संध्या वामन खैरे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तालुका नर्सिंग अधिकारी म्हणून सेवेत असलेल्या श्रीमती संध्या खैरे यांना त्यांच्या दहावीच्या १९८४ बॅचच्या सर्व माजी विद्यार्थी मित्र- मैत्रिणी यांनी भेटवस्तू देऊन सत्कार केला. Nursing Officer Sandhya Khaire retired
या कार्यक्रमासाठी गुहागर पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम जांगिड, माजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र पवार, रत्नागिरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देविदास चरके, वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज देशमुख, चिखली प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकला वाडकर, तळवळी प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. सुप्रीम कुमार कांबळे, डॉ. प्रफुल कांबळे आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋतुजा गंगावणे, संगमेश्वरचे नायब तहसीलदार सुधीर यादव, दत्तात्रय भस्मे, माजी पंचायत समिती सभापती दीप्ती असगोलकर, माजी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती स्मिता धामणस्कर, डॉ. बळवंत, डॉ. स्मिता बळवंत, डॉ. सुरेश भाले, डॉ. श्रीमती स्वप्नाली भाले, नासिमशेठ मालाणी, दिग्विजय देवरे, सागर पाटील, स्नेहल खेडेकर, रश्मी देवरे अक्षदा पाटील, विजयालक्ष्मी देवरे, महेश वेल्हाळ, श्रीमती सातपुते, सागर मोरे आदी उपस्थित होते. Nursing Officer Sandhya Khaire retired