रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
गुहागर, ता. 13 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. जागतिक पर्यावरण दिनी सकाळी हाउसिंग कॉलनी मध्ये उपस्थित आरजीपीपीएलच्या अधिकारी व कर्मचारी यांनी पर्यावरण संवर्धन कटिबद्धतेची व पर्यावरण संतुलन राखण्यासंदर्भात शपथ घेतली. Tree plantation at Ratnagiri Gas Company
यानिमित्त हाऊसिंग कॉलनी परिसरात पर्यावरण जनजागृती संदर्भात प्रभातफेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीमध्ये करूया पृथ्वीचे संगोपन, राखू पर्यावरणाचे संतुलन याबाबत जनजागृती करण्यात आली. या प्रभात फेरीचा मुख्य उद्देश सर्वांनी पर्यावरणाबद्दल जागरूक राहणे हा होता. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रानवी ग्रामपंचायतीला ५० काजूची रोपे देण्यात आली. आरजीपीपीएल परिसरात अधिकारी व कामगारांनी काजूच्या झाडाची लागवड केली. Tree plantation at Ratnagiri Gas Company
यावेळी आरजीपीपीएल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कुमार तखेले व सर्व व्यवस्थापक, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान आणि इतर कामगार सहभागी झाले होते. संपूर्ण आरजीपीपीएल कंपनीमध्ये हा दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला. आरजीपीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कुमार तखेले यांनी सर्वांना जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. व पर्यावरण अधिक सुंदर करण्याचे आवाहन केले. यावेळी आरजीपीपीएलचे अनेक वरिष्ठ अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान आणि सर्व कामगार सहभागी झाले होते. Tree plantation at Ratnagiri Gas Company