कोंकणवासीयांची मागणी, सुरेश प्रभुंची कामे पूर्णत्वास जातील
रत्नागिरी, ता. 08:- नुकताच लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल जाहिर झाला. ऱाज्यातील भाजप प्रणित महायुतीच्या पारड्यात सर्वाधिक जागा या कोंकणातुन दिल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री पद भुषवलेल्या आणि मागील सरकार मध्ये केंद्रात मंत्री म्हणुन काम केलेल्या नारायण राणे यांच्याकडे रेल्वे मंत्रालय दिल्यास कोंकण रेल्वेच्या माध्यमातुन कोंकणचा पर्यटन विकास साधता येइल. ना. राणे याना संपुर्ण राज्याचा उत्तम अभ्यास असल्याने त्यांच्या अनुभवाचा मुंबईतील उपनगरीय रेल्वे च्या विकासासाठी देखील फायदा होइल. त्यामुळे ना. नारायण राणेना रेल्वे मंत्रालय द्यावे,अशी कोंकण वासीयांची मागणी आहे. Demand of Konkan residents
पालघर; कल्याण; ठाणे; रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदार संघातुन महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. कोंकणाचा विकास साधायचा असेल तर कोंकणातुन निवडून गेलेल्या आणि कोंकणाच्या विकासाबद्दल आस्था असणा-या एखाद्या नेत्याला महत्वाचे खाते मिळाल्यास कोंकणाचा विकास नक्कीच होइल. Demand of Konkan residents
सुरेश प्रभुंचे काम पुढे नेतील मोदी पर्व 1 मध्ये सिंधुदूर्गतील सुरेश प्रभु यांच्याकडे रेल्वे मंत्रीपद देण्यात आले होते. त्यांनी या मंत्रीपदाद्वारे कोकण रेल्वेवर विशेष लक्ष दिले. त्यांच्याच काळात कोकण रेल्वेच्या दुपरीकरणाचा महत्त्वपूर्ण झाला. रोहा ते वीर असे पहिल्या टप्प्यातील दुहेरीकरणाचे कामही पूर्णत्वास गेले. त्यापाठोपाठ कोकण रेल्वेच्या मार्गाचे विद्युतीकरणाचा निर्णयही झाला. त्यामुळे आज धुरांचे लोटातून प्रदुषण करणारी डिझेल इंजिन बंद झाली. गुहागर तालुक्यातील आरजीपीपीएलकडून प्रतिदिन 500 मेगावॅट वीज खरेदीचा निर्णय घेवून आरजीपीपीएल प्रकल्प सुरु ठेवण्याचे काम सुरेश प्रभुंनीच केले. त्यामुळे गुहागर, दापोली, चिपळूण परिसरातील अनेकांचे रोजगार टिकून राहीले होते. भारतीय रेल्वेबरोबरचा आरजीपीपीएलचा करार संपला तेव्हा सुरेश प्रभु रेल्वे मंत्री नव्हते. त्यामुळे महागडी वीज घेण्यास भारतीय रेल्वेने नकार देत कराराचे नुतनीकरण केले नाही. त्याचा फटका या प्रकल्पात अनेक वर्ष काम करणाऱ्या स्थानिकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या.
लोटे एमआयडीसीमध्ये कोकण रेल्वेला विविध सामग्री, सुटे भाग पुरविणाऱ्या कारखान्याच्या निर्मितीचा निर्णय सुरेश प्रभु यांच्या कार्यकाळात झाला. मात्र हा निर्णय फाईलमध्ये राहीला. चिपळूण कराड आणि रत्नागिरी कोल्हापूर या रेल्वेमार्गाची चर्चा सुरेश प्रभुंच्या कार्यकाळातच सुरु झाली. चिपळूण कराड मार्गाच्या सर्व्हेसाठी एमओयुदेखील झाला. मात्र तेही काम खर्चिक असल्याने पुढे सरकले नाही. खासदार नारायण राणे रेल्वेमंत्री झाल्यास निश्चितच त्याचा फायदा कोकण रेल्वेला व पर्यायाने भारतीय रेल्वेला होईल. उद्या मोदी सरकारचा शपथविधी होत आहे. उद्या कोण कोण शपथ घेतात आणि कुणाला कुठचे खाते मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून रहिले आहे. याचवेळी कोकणवासीयांनी माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री व नवनिर्वाचित खासदार नारायण राणेंना रेल्वे मंत्रालय देण्याची केलेली मागणी महत्त्वाची मानली जात आहे. Demand of Konkan residents