जागतिक पर्यावरण दिनी गुहागर हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम
गुहागर, 06 : गुहागरवासीयांचे तसेच फिरण्याचे, वनभोजनाचे ठिकाण म्हणून बारमाही वाहणाऱ्या रेवा नदीपात्राची ओळख आहे. या नदी परिसरातील अनेक ठिकाणी वनभोजनासाठी आलेली मंडळी कचरा करतात. नदीपात्र कचरामुक्त करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनाचे निमित्त साधुन गुहागर हायस्कुलमधील माजी विद्यार्थ्यांनी नदीपात्राची स्वच्छता केली. Garbage free Rewa river bed
गुहागर मधील कचरनाथ स्वामी मठ परिसरातून बारमाही वाहणारी रेवा नदी वहाते. या नदीशी गुहागरवासीयांचे जिव्ह्याळ्याचे नाते आहे. गुहागरवासीय गेल्या अनेक पिढ्यांपासुन पाहुण्यांना घेवून वनभोजनासाठी, नदीस्नानासाठी, निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी या नदीपात्राच्या परिसरात फिरण्यासाठी येतात. आता तर अनेक पर्यटकही परटवणे, कचरनाथ स्वामी मठ, बारटक्के धाण परिसरात येतात. ह्या ठिकाणी येणारे नागरिक, पर्यटक वापरलेल्या पाण्याच्या, शितपेयांच्या, दारुच्या प्लास्टिक व काचेच्या बाटल्या, कुरकुरे, वेफर्स आदी खाद्यपदार्थांचे प्लास्टिक रॅपर इत्यादी नदीपात्रातच टाकून देतात. यावर्षी पर्यावरणाला मारक असणाऱ्या या वस्तू नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जमा झाल्या होत्या. Garbage free Rewa river bed
श्रीदेव गोपाळ कृष्ण विद्यामंदिर, गुहागरमधुन 1992-93 मध्ये दहाविची परिक्षा दिलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या बॅच ने पुढाकार घेऊन दिनांक 05 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रेवा नदी पात्रात स्वच्छता मोहिम राबवली. जमा झालेले प्लास्टिक व काचेच्या बॉटल तसेच प्लास्टिक पिशव्या जमा करून गुहागर नगरपंचायतच्या कचरा विलीगिकरण केंद्रात जमा केल्या. या स्वच्छता मोहिमेत हर्षल बावधनकर, नितिन खानविलकर, पराग मालप, उमेश भोसले, मयुरेश कचरेकर, किरण बावधनकर, समीर गुरव सर, राजेश तुळसूणकर, अभय साटले इत्यादींनी सहभाग घेतला. दरम्यान ही स्वच्छता मोहिम सुरु होती त्याचवेळी गुहागर शहरातील राणोबा मित्रमंडळ वनभोजनासाठी त्याच परिसरात आले होते. आपलेच गुहागरमधील काही सहकारी, मित्र स्वच्छता करत असल्याचे त्यांनी पाहीले आणि वनभोजनासाठी आलेल्या राणोबा मित्रमंडळाच्या केदार मालप, मनोज बोले, प्रसाद बोले, विनोद मालप, अमित मालप, मंदार बोले, आशिष वरंडे, आस्वाद वरंडे आदींनी स्वयंस्फूर्तीने अभियानात सहभाग घेऊन मोलाचे सहकार्य केले. Garbage free Rewa river bed
निसर्गाचे वरदान म्हणून लाभलेल्या या बारमाही वाहत्या नदीचेपात्र प्रदूषण आणि प्लास्टिक मुक्त ठेवण्याची जबाबदारी हि इथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची असुन त्यांनी ती पाळावी असे आवाहन ह्यावेळी केले. Garbage free Rewa river bed