कुणबी समाजोन्नती संघ गुहागर तवसाळ गट कार्यकर्ते व संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम यांच्या प्रयत्नांना यश
गुहागर, ता. 03 : तालुक्यातील वैद्यकीय सेवेतील एक अग्रगण्य नाव असणारे संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम, गुहागर यांनी गोरगरीब गरजू लोकांच्या वैद्यकीय सेवेसाठी कोरोना पासून काम चालू केले. आता त्यांचा काम संपूर्ण महाराष्ट्र मध्ये विस्तारलं आहे. गरीब गरजू रुग्णांना ही वैद्यकीय टीम आधार बनली आहे. Chief Minister’s Assistance Fund
अशाच प्रकारे दिनांक २ मे २०२४ रोजी गुहागर तालुक्यातील तवसाळ गटातील कुणबी समाज बांधव श्री संतोष हरिश्चंद्र वेलोंडे यांचा दुचाकी वरून भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांचा उजवा पायाच्या पोटरी पासून ते गुढघ्याच्या वाटीपर्यंत दुखापतग्रस्त झालेला व ढोपराच्या हाडाचे तीन तुकडे झालेले होते. त्यांना त्वरित रत्नागिरीतील अपेक्स हॉस्पिटल नेऊन त्यांच्या पायावर त्वरित उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अजूनही एक शस्त्रक्रिया बाकी आहे. परंतू झालेल्या उपचारांचा खर्च हा त्यांच्या कुटुंबाला न झेपणारा होता. म्हणूनच त्यांच्या मुलांनी मदतीचे आवाहन करणारा मेसेज सोशल मीडियावर टाकला. या आवाहनाला समाजातील अनेक समाजप्रेमी लोकांनी त्यांना आर्थिक सहाय्य केले. Chief Minister’s Assistance Fund
सदर मदतीच्या आवाहनाचा संदेश वाचून कुणबी समाज तवसाळ गटाचे विद्यमान सरचिटणीस श्री. बबन माटल यांनी त्वरित समाजसेवक संतोष दादा जैतापकर साहेब यांच्या वैद्यकीय टीम सोबत स्वतः संपर्क केला. त्यावेळी संतोष दादा जैतापकर साहेब यांनी शब्द दिला की नक्कीच वैद्यकीय टीम मार्फत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून मदत मिळून देऊ. त्याप्रमाणे पालकमंत्री साहेबाच्या मार्फत अर्ज करून 50 हजार रुपये आर्थिक सहकार्य मिळून दिले. यावेळी कुणबी समाज तवसाळ गटातील श्री बबन माटल व स्थानिक तरुणांच चांगले सहकार्य मिळाले. संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम मार्फत श्री मनोज डाफळे, श्री काशीराम पास्टे, श्री संदीप खैर, मितेश घडशी, महेंद्र आंबेकर व मुंढर गाव माजी सरपंच श्री सुशील आग्रे यांनी मोलाचे सहकार्य केले. Chief Minister’s Assistance Fund