गुहागर, ता. 02 : लाल परी अर्थातच ए.टी च्या 76 व्या वाढदिवसानिमित्त गुहागर आगारांमध्ये केक कापून आणि लाल परीचे पूजन करून वाढदिवस थाटात साजरा करण्यात आला. यावेळी गुहागर आगार व्यवस्थापिका सौ सोनाली कांबळे मॅडम, अधिकारी कर्मचारी, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी व इतर प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Amritmahotsav Anniversary of ST
ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, महाराष्ट्राच्या विकासात सिंहाचा वाटा असलेली लाडक्या लालपरीचा (एसटी) काल १ जून रोजी ७६ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. ७७ व्या वर्षात पदापर्ण करणाऱ्या एसटीने आता आधुनिकतेच्या वाटेवर प्रवास सुरु केला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात सेवा देणाऱ्या एसटीचे महत्व मात्र कोणी नाकारु शकत नाही. शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत एसटी धावते. ग्रामीण भागातील नागरिकांचे तर एसटी हे प्रमुख वाहतुकीचे साधनआहे. सध्या १५ हजार बसेस, ५६० पेक्षा जास्त बस स्थानकांवरून दररोज लाखो प्रवाशांची वाहतूक केली जाते. १ जुन १९४८ रोजी पुणे- अहमदनगर मार्गावर पहिली एसटी धावली. या घटनेला एक जूनला ७६ वर्षे पूर्ण होत आहेत. एसटीचा हा अमृतमहोत्सवी वर्धापन दिन आहे. Amritmahotsav Anniversary of ST