• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जिल्हयात 27 मे ते 10 जून मनाई आदेश

by Manoj Bavdhankar
May 25, 2024
in Ratnagiri
92 1
1
Prohibition order in the district
180
SHARES
515
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 25 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक लोकसभा मतदार संघ 46 रत्नागिरी -सिंधुदुर्ग व 32 रायगड-रत्नागिरी  लोकसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी दि. 4 जून रोजी होणार आहे. निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर विजयी उमेदवारांकडून मिरवणुकीचे आयोजन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दि. 27 मे ते 10 जून कालावधीत फौजदार प्रक्रिया संहिता कायदा 1973 चे कलम 144 नुसार मनाई आदेश लागू करण्यात आल्याचा आदेश अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिला आहे. Prohibition order in the district

एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करणे, वर्तमान पत्रांमध्ये वारंवार एकमेकांविरुध्द टीका टिप्पणी करणे, सोशल मीडियावर एकमेकांविरोधात माहिती प्रसारीत करणे, राजकीय पक्षांमधील किरकोळ वादाचे आरोप प्रत्यारोपांचे एखाद्या घटनेत होवून, तणाव निर्माण होवून, त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी हे आदेश लागू करण्यात आले आहेत. मतमोजणी शांततेत व व्यवस्थीतपणे पार पाडण्यासाठी सर्व परवानाधारकांना शस्त्र न बाळगणे व बरोबर घेवून न फिरणे यांस मनाई करण्यात आली आहे.  या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)  नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही श्री. सूर्यवंशी यांनी दिला आहे. Prohibition order in the district

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarProhibition order in the districtUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share72SendTweet45
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.