डॉ. विनय नातू फॅन क्लबतर्फे होम मिनिस्टर कार्यक्रम; विजेत्या महिलेले पैठणी आणि सोन्याची नथ
गुहागर, ता. 21 : गुहागर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार डॉ. विनय श्रीधर नातू यांच्या ६० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने डॉ. विनय नातू फॅन क्लबच्या वतीने शिर्के मंगल कार्यालय, मार्गताम्हाने येथे गुरुवार २३ मे रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० यावेळेत षष्ठ्यब्दीपूर्ती अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. Birthday of Dr. Vinay Natu
राजकारण विरहित संपन्न होणाऱ्या डॉ. विनय नातू यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात महिला भगिनींसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या सर्व महिला भगिनींना डॉ . विनय नातू फॅन क्लबच्यावतीने भेट वस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. होम मिनिस्टर कार्यक्रमातील अंतिम विजेत्या भगिनीला मानाची पैठणी आणि सोन्याची नथ देऊन गौरविण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकासाठी कुकर आणि मानाची पैठणी देण्यात येणार आहे. तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या भगिनीचा इस्त्री आणि मानाची पैठणी देऊन गौरव करण्यात येणार आहे. तर अंतिम फेरीतील इतर स्पर्धकांना मानाची पैठणी देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील एका भगिनीचा साडी देऊन सत्कार करण्यात येणार आहे. Birthday of Dr. Vinay Natu
सर्व सामान्यांचे सर्व समावेशक, कुशल,अभ्यासु, संयमी नेतृत्व म्हणून ओळख असणाऱ्या डॉ. विनय श्रीधर नातू यांच्या ६० व्या जन्मदिन सोहळ्यासाठी सर्वांनी अगत्यपुर्व उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.विनय नातू फॅन क्लबच्यावतीने करण्यात आले आहे. Birthday of Dr. Vinay Natu