• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तांडेल झोपला अन् बोट चढली खडकावर

by Guhagar News
May 17, 2024
in Guhagar
270 3
1
530
SHARES
1.5k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 17 : तालुक्यातील बोर्‍या बंदरावर विसावण्यासाठी जाणारी हर्णे बंदरातील समुद्रात मच्छीमारीसाठी आलेली बोट तांडेलला आलेल्या डुलकीमुळे चक्क खडकावर चढून – अडकली. सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. बोटीसह तांडेल, खलाशी असे सातहीजण सुखरूप आहेत. ही घटना गुहागर तालुक्यातील बोर्‍या समुद्रकिनारी देवीच्या डोंगरालगत बुधवारी मध्यरात्री 12 वाजता घडली. गुरुवारी दिवसभर बोट काढण्याच्या प्रयत्नाला यश आलेले नाही. मात्र बोटीमधील इंजिन काढण्यात आले असून यामध्ये सुमारे 30 ते 35 लाखाचे नुकसान झाले आहे. Boat climbed onto the rock

दापोली तालुक्यातील हर्णे येथील हरेश वासुदेव कुलाबकर यांच्या मालकीची जानकी इंडिया महाराष्ट्र 4 एमएम 1669 ही मच्छीमार बोट आहे. बुधवारी रात्री हर्णे बंदरातून गुहागरच्या समुद्रामध्ये जोराच्या वार्‍यामुळे बोर्‍या बंदरात विसावण्यासाठी येत होती. बोटीवर नरेश पालेकर हे तांडेल तर 7 खलाशी होते. समुद्रातून बोट बोर्‍या बंदरात आणताना देवीच्या डोंगराच्या बाजूने आणावी लागते. त्याप्रमाणे बोट आणत असताना तांडेलला डुलकी आली आणि बोटीच्या स्टेअरींगची साखळी तुटल्याने बोट थेट डोंगराच्या कडेला असलेल्या खडकावर जाऊन अडकली. ही घटना बुधवारी मध्यरात्री 12 वाजताची असून यावेळी सुरू असलेल्या भरतीमुळे बोट थेट खडकावर जाऊन अडकली. भरतीमुळे खडकाचा दणका मिळाला नाही. यामुळे बोट लगेच फुटली नाही. हे प्रसंगावधान राखून तांडेलसह 7 खलाशी सुखरूप खडकावर उतरले. Boat climbed onto the rock

दरम्यान या घटनेची खबर गुहागरचे मत्स्य परवाना अधिकारी स्वप्नील चव्हाण यांना मिळताच त्या ठिकाणी सागरी सुरक्षारक्षक रवाना केले. तसेच गुरुवारी दिवसभर खडकात अडकलेली ही बोट काढण्याचा प्रयत्न सुरू होता मात्र त्याला यश आले नाही परंतु खडकावर आदळलेली ही बोट निकामी झाली असून बोटीतील इंजिन काढण्यात आले आहे. यात बोट मालकाचे सुमारे 30 ते 35 लाखाचे नुकसान झाले. Boat climbed onto the rock

Tags: Boat climbed onto the rockGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share212SendTweet133
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.