लोकसभा निवडणुकांचे निमित्त, उर्वरित शाळा दुरुस्तीच्या प्रतिक्षेत
गुहागर, ता. 17 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शाळांची दुरुस्ती जलदगतीने केली जाते. गुहागर तालुक्यातील ५३ जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती करण्यात आली असून उर्वरित शाळांची दुरुस्ती कधी होणार? असा सवाल उपस्थित होत आहे. Repair of schools due to polling booths
तालुक्यातील ५३ शाळांमध्ये मतदान केंद्र होते. त्यामुळे त्यांच्या दुरुस्तीला त्वरीत मंजुरी मिळाली. निगुंडळ नं.1, गुहागर क्र.2, गुहागर जांगळेवाडी, उमराठ नं.1, असोरे, तळवली नं.1, तळवली आगरवाडी, सुरळ, गोणवली, जामसूत नं.1, दोडवली, पांगारीतर्फे वेळंब नं.1, आरे भंडारवाडा, पेवे खरेकोंड, धोपावे नं.1, चिखली नं.1, गिमवी, पालशेत, पालशेत नं.1, कोतळूक नं.1, कोतळूक शिगवणवाडी, मासू नं.2, चिंद्रावळे नं.1, पडवे, पडवे उर्दू, कर्दे नं.2, काताळे नवानगर, पाचेरीसडा कवठेवाडी नं.2, पिंपळवट, कुटगिरी नं.2 पातीवाडी, वडद नं.1, परचुरी नं.2 डाफळेवाडी, परचुरी नं.1, कारुळ, जानवळे नं.2, वेळंब नं.2 घाडेवाडी, वेळणेश्वर भाटी, आंबेरे खुर्द, कुडली नं.1, साखरी त्रिशूळ, आरे देवरहाटी, मुंढर नं.2, सडेजांभारी नं.1, पालपेणे, मढाळ नं.2, उमराठ नं.2, नरवण नं.2, काताळे नं.1, पाटपन्हाळे नं.1 या सर्व जिल्हापरिषद प्राथमिक मराठी शाळांची छप्पर दुरुस्ती, खिडकी, दरवाजे, वीजपुरवठा, शौचालय व रँम्प दुरुस्ती आदी कामे करण्यात आली. Repair of schools due to polling booths
गुहागर तालुक्यात इतर शाळांची दुरुस्ती अद्याप झालेली नाही. केवळ मतदान केंद्र असल्याने वरील शाळांची दुरुस्ती झाली. यापैकी तळवली नं.1 मराठी शाळेच्या 2 वर्गखोल्यांची कामे अद्याप झालेली नाहीत. ही इमारत संपूर्ण स्लँबची असून प्लँस्टर व लादी यांची कामे बाकी आहेत. नोव्हेंबरपासून या शाळेची उभारणी सुरु आहे. मात्र, अद्यापही काम अपूर्ण आहे. सध्या येथे शाळा एका खासगी जागेत भरते. उन्हाळ्याची सुट्टी असल्याने सध्या तरी गैरसोय नसली तरी ठेकेदाराने नव्या इमारतीचे काम जूनपूर्वी करावे, जेणेकरुन नव्या इमारतीत जूनच्या शैक्षणिक वर्षात येथे शाळा भरेल, अशी सूचना शिक्षण विभागाने केली आहे. Repair of schools due to polling booths