• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तळेकांटे येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम

by Guhagar News
May 13, 2024
in Maharashtra
70 0
0
Annual Reunion at Talekante
137
SHARES
391
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कोकणातील तरुणांना रोजगार मिळावा अशी सत्तेत बसलेल्या प्रस्थापित नेत्यांची मानसिकता नाही; सुहास खंडागळे

रत्नागिरी, ता. 13 : मागील दोन वर्षात कोकणाला दोन- दोन उद्योगमंत्री मिळाले तरीही येथे तरुणांसाठी रोजगार उपलब्ध होत नसेल तर येथील जनतेच्या हिताचे धोरण राबवण्याची मानसिकता सत्तेत बसलेल्या प्रस्थापित नेत्यांची नाही अशी रोखठोक भूमिका गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी तळेकांटे येथे आयोजित कार्यक्रमात मांडली. रेवाळे वाडीत आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. Annual Reunion at Talekante

यावेळी बोलताना खंडागळे म्हणाले की, कोकणातील रोजगारासाठी तरुणांचे होणारे स्थलांतर हा गंभीर विषय असून या प्रश्नाकडे सत्ताधारी गांभीर्याने पाहत नाहीत. रिफायनरी सारखा एखादा प्रदूषणकारी प्रकल्प कोकणावर लादून नागरिक आणि शासन यांच्यातील संघर्षात कोकणाच्या भविष्याची दहा दहा वर्ष वाया घालवली जातात, मात्र कोकणच्या हिताचे प्रकल्प कोकणात आणले जात नाहीत. मागील दोन वर्षात कोकणाला केंद्र व राज्य शासन असे दोन दोन उद्योग मंत्री मिळाले. मात्र तरीही कोकणच्या हिताचे उद्योग येथे येऊ शकले नाहीत. मुळात कोकणात तरुणांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा अशी प्रस्थापित राजकीय नेत्यांची मानसिकता नाही.गाव विकास समितीमार्फत वारंवार शासनाकडे येथील तालुकानिहाय एमआयडीसी विकसित करण्याची मागणी लावून धरण्यात आली. येथील एमआयडीसी देखील ओस पडलेल्या आहेत याकडे सुहास खंडाळे यांनी लक्ष वेधले.येथील तरुण शिक्षण घेतात आणि नोकरी धंद्यासाठी मुंबई पुणे अन्य शहरांमध्ये जातात. बेरोजगारी व स्थलांतर यावर धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असून असे धोरण दुर्दैवाने शासनाकडून ठरवलं जात नाही तसेच कोकणाबाबत राज्य शासन उदासीन असून येथील वाढत्या बेरोजगारीला शासनाची कोकणाबाबतची भूमिका जबाबदार असल्याचे सुहास खंडागळे यावेळी म्हणाले. Annual Reunion at Talekante

यावेळी मंचावर गाव विकास समितीचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते मुझम्मील काझी, महिला संघटना अध्यक्षा सौ.दिक्षा खंडागळे, सदस्य ऍड.सुनील खंडागळे, सदस्य मनोज घुग, उपसरपंच राजू येद्रे, तंटामुक्त अध्यक्ष, चंद्रकांत रेवाळे, तुकाराम रेवाळे, सौ.मनीषा बने, नवतरुण मित्रमंडळ रेवाळे वाडीचे सर्व पदाधिकारी, महिला, विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. Annual Reunion at Talekante

Tags: Annual Reunion at TalekanteGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share55SendTweet34
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.