आदि शंकराचार्य जयंतीनिमित्त आयोजन
रत्नागिरी, ता. 10 : झाडगाव येथील श्री गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळा आणि रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाच्या संयुक्त विद्यमाने आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले आहे. वैशाख शुक्ल पंचमीला अर्थात रविवारी दि. १२ मे रोजी सायंकाळी ५ वाजता राणी लक्ष्मीबाई सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. यात वक्ते वेदमूर्ती सचिन भाटवडेकर आद्य शंकराचार्यांचे स्तोत्रवाङ्मय या विषयावर व्याख्यान देणार आहेत. Lecture by Bhatvadekar at Ratnagiri
वेदमूर्ती सचिन भाटवडेकर हे आवळेगाव (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील आहेत. त्यांनी शालेय शिक्षणानंतर पाठशाळेत संपूर्ण याज्ञिक आणि संस्कृत एमए, बीएड्.पर्यंत झाले आहे. श्रीमद् भागवत कथा, रामायण कथा या कथा सांगण्याचा त्यांचा व्यासंग आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन पाठशाळेचे अध्यक्ष वैद्य मंदार भिडे, सचिव जयराम आठल्ये आणि रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी केले आहे. Lecture by Bhatvadekar at Ratnagiri
आदि शंकराचार्यांचा जन्म सन ७८८ मध्ये वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला झाला. आदि शंकराचार्यांनी वयाच्या 8 व्या वर्षी सर्व वेदांचे ज्ञान प्राप्त केले होते. त्यांनी भारतभ्रमण करून चारही दिशांना चार पीठांची स्थापना केली. जे आजचे चार धाम आहेत. शंकराचार्यांनी गोवर्धन पुरी मठ (जगन्नाथ पुरी), शृंगेरी पीठ (रामेश्वरम), शारदा मठ (द्वारिका) आणि ज्योतिर्मठ (बद्रीनाथ धाम) स्थापन केले होते. त्यांनी अनेक प्रकारची स्तोत्ररचनासुद्धा केली. त्यासंबंधी श्री. भाटवडेकर व्याख्यान देणार आहेत. Lecture by Bhatvadekar at Ratnagiri