गुहागर, ता. 08 : गुहागर तालुक्यात अत्यंत धीम्या गतीने, शांततेत लोकसभा निवडणुकीचे मतदान झाले. 56.43 टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 53.77 टक्के मतदान झाले आहे. सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात मतदारांनी मतदान करण्यास पसंती दिल्याचे मतदानाच्या टक्केवारीवरुन समोर येत आहे. दुपारी 1 ते 3 या काळात केवळ 4.57 टक्केच मतदान झाले. Peaceful voting in Guhagar


सकाळी 7 वाजता मतदानाला सुरवात झाली त्यावेळी मतदान केंद्रांवर फारशी गर्दी नव्हती. सकाळी 7 ते 9 या दोन तासांत केवळ 9.50 टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदान केंद्रांवर थोडीफार गर्दी दिसू लागली. 9 ते 11 या कालावधीत मतदानाचा टक्का 16 टक्क्यांनी वाढला. 11 ते 1 या कालावधीत 13.93 टक्क्यांनी मतदान वाढले. दुपारी 1 ते 3 या काळात केवळ 4.57 टक्केच मतदान झाले. त्यानंतर पुन्हा मतदानाची गती वाढली. सायंकाळच्या दोन तासांत 9.77 टक्के मतदान झाले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 53.77 टक्के मतदान झाले आहे. Peaceful voting in Guhagar


दरवर्षी मतदानाचे दिवशी कार्यकर्त्यांची मतदारांना केंद्रापर्यंत घेवून जाण्यासाठी असणारी लगबग, वाहनांची वर्दळ, बुथवर गर्दी असे चित्र दिसून येते. यावेळी मतदार, कार्यकर्ते यांच्यात फारसा उत्साह दिसून आला नाही. संथपणे एका लयीत मतदान सुरु होते. गुहागर तालुक्यातील नोकरी उद्योगासाठी परगावी असलेल्या मतदारांची संख्या जवळपास 15 ते 20 हजार आहे. या मतदारांसाठी राजकीय पक्षांकडून गाड्यांची व्यवस्था केलेली असते. यावेळी मात्र अशी कोणतीही वाहन व्यवस्था दोन्ही राजकीय गटांनी केल्याचे दिसून आले नाही. नवमतदारांमध्ये, तरुणांमध्ये मतदान करण्याचा उत्साह होता. पर्यटन विकास, देशाची प्रगती, राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मजबुती आणि रोजगार या मुद्द्यांवर मतदान केल्याचे सोहम वैद्य, रुही मावळंकर, यश फडके आणि अथर्व घाणेकर या नव मतदारांनी सांगितले. Peaceful voting in Guhagar


मतदान केलेल्यांना सवलतीलच्या दरात साखर
गुहागर वरचापाट येथील गोखले स्टोअर्सचे तरुण व्यावसायिक अद्वैत गोखले यांनी मतदानाचा टक्का वाढावा म्हणून एक उपक्रम केला. मतदानाच्या शाईची खूण दाखविणाऱ्या मतदाराला प्रति किलो 2 रु. सवलतीच्या दरात साखर देण्याचे त्यांनी निश्चित केले आहे. ही योजना गुरुवार 9 मे पर्यंत सुरु रहाणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांमध्ये उत्साह यावा, 100 टक्के मतदान व्हावे म्हणून हा छोटासा प्रयत्न मी करत असल्याचे अद्वैत गोखले यांनी सांगितले. Peaceful voting in Guhagar