• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शृंगारतळीत पोलिसांचे रुट मार्च

by Ganesh Dhanawade
May 3, 2024
in Politics
135 1
0
Police route march in the wake of elections
265
SHARES
757
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 03 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुहागर पोलिस स्थानकाच्या हद्दीत शृंगारतळी बाजारपेठेत मंगळवारी सायंकाळी रुट मार्च करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दलही सज्ज झाले आहे. पोलिसांकडून शृंगारतळी बाजारपेठेत संचलन करून नागरिकांना निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. Police route march in the wake of elections

निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असेही पोलिसांकडून आवाहन करण्यात आले. पथसंचलनाद्वारे निवडणूक शांततेत पार पाडण्याबाबत आवाहन करण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी राजमाने नाव, पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे संचलन करण्यात आले. या संचलनात गुहागर पोलिस स्थानकाचे अधिकारी, कर्मचारी,एसआरपीचे अधिकारी व जवान सहभागी झाले होते. Police route march in the wake of elections


Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarPolice route march in the wake of electionsPoliticsUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share106SendTweet66
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.