गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने आयोजन
गुहागर, ता. 29 : गुहागर अपंग पुनर्वसन संस्थेच्या २२ वा वर्धापनदिनानिमित्त जिल्हास्तरीय सर्वसमावेशक वधु-वर सूचक मेळावा शनिवार दिनांक ४ मे २०२४ रोजी दुपारी ठीक १२.३० वाजता संस्थेची कार्यालय वरवेली, चिरेखाणफाटा येथे आयोजित करण्यात आला आहे. या संस्थेमार्फत सर्व प्रकारच्या दिव्यांगासाठी व सामान्य लोकांसाठी गेल्या २२ वर्षात अनेक उपक्रम राबविले आहेत व राबवत आहोत. या संस्थेला दिव्यांग आयुक्तालय पुणे यांचे दिव्यांग क्षेत्रात कार्य करण्यासाठी अधिकृत शासकीय नोंदणी प्रमाणपत्र मिळालेले आहे. bride-groom indicator gathering
या वधु-वर सूचक मेळाव्यामध्ये सर्व प्रकारच्या जाती धर्मातील दिव्यांग, विधुर, विधवा व सर्वसामान्य लोकांनी या जिल्हास्तरीय वधु-वर सूचक मेळाव्यामध्ये सहभागी होता येईल.यासाठी सोबत 1) फुल साईज फोटो दोन, 2) रेशनकार्ड झेरॉक्स 3) अपंग प्रमाणपत्र झेरॉक्स, 4) आधार कार्ड झेरॉक्स, 5) जन्मपत्रिका, 6) आर्थिक उत्पन्नाचे साधन स्वलिखित तसेच विधवा, विधुर व सर्वसामान्य व्यक्तीनी अपंग प्रमाणपत्र वगळून इतर कागदपत्र सोबत घेऊन यावीत. bride-groom indicator gathering
सदरचा वधु-वर सूचक मेळावा पुर्णपणे मोफत असून तो सर्वांसाठी खुला आहे. मेळाव्यासाठी स्वखर्चाने उपस्थित रहायचे आहे. तरी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व दिव्यांग, विधुर, विधवा व सर्व सामान्यांनी वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे.असे गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेमार्फत कळविण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 7350832024, 7218697247, 8007301618, 7066457970 या नंबरवर संपर्क करावा. bride-groom indicator gathering