• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दापोली समर सायक्लोथॉन २०२४ संपन्न

by Guhagar News
April 29, 2024
in Ratnagiri
57 0
0
Dapoli Summer Cyclothon
111
SHARES
318
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

२०० स्पर्धकांची उपस्थिती

गुहागर, ता. 29 : सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित दापोली समर सायक्लोथॉन २०२४, सिझन ५ सायकल स्पर्धा रविवार २८ एप्रिल २०२४ रोजी उत्साहात संपन्न झाली. यामध्ये महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील, देशातील वय ८ ते ७१ वयोगटातील २०० स्पर्धक आपल्या कुटुंबीयांसमवेत सहभागी झाले होते. Dapoli Summer Cyclothon

Dapoli Summer Cyclothon

दापोली आसूद हर्णै मुर्डी आंजर्ले आडे उटंबर दापोली या समुद्रकिनाऱ्यावरील ६० किमी मार्गावर कोकणातील निसर्ग सौंदर्य अनुभवत सर्वांनी सायकल चालवली. मार्गावर असलेल्या अनेक पर्यटन ठिकाणांना भेटी दिल्या, आंजर्ला कासव महोत्सव अनुभवला, आंबे फणस, मासे खाल्ले. ही सायक्लोथॉन स्पर्धा ३० व ६० किमी कोस्टल सिनिक रुट, शॉर्ट सिटी लूप, फॅन राईड अशा अनेक गटात झाली. ६० किमी अंतर अनेकांनी ३ तासाच्या आत पूर्ण केले. सर्व स्पर्धकांना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. Dapoli Summer Cyclothon

Dapoli Summer Cyclothon

यामध्ये ७१ वर्षीय प्रवीणकुमार कुलथे ठाणे, ६०+ वयोगटातील सतीश जाधव परेल, डॉ चिमा चेंबूर, सुनील गाडगीळ जोगेश्वरी, अनंत सहस्त्रबुद्धे छत्रपती संभाजीनगर, धनंजय तेलगोटे ठाणे, विनायक वैद्य खेड, सीताराम रोकडे, बाला रोकडे सिवूड, सुवर्णा अडसुळे ठाणे, महेश दाभोलकर ऐरोली इत्यादींना खास सन्मानचिन्ह देण्यात आले. तसेच ६० किमी पूर्ण करणारे लहान सायकलस्वार १४ वर्षीय वरद कदम, स्वराज मांजरे, साईप्रसाद वराडकर, आयुष जोशी, वेदांग करंदीकर हे ठरले. ३० किमी पूर्ण करणारे लहान सायकलस्वार १३ वर्षीय अवधूत पाते, रुद्र बडबे हे ठरले. शॉर्ट सिटी लूप गटात ८ वर्षीय आदिनाथ शिगवण आणि अनन्या गोलांबडे हे लहान सायकलस्वार ठरले. या सायक्लोथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी एका दिवसात २३० किमी अंतर सायकल चालवत कल्याण ठाणेहुन आलेले राज वाघ, चिन्मय फोंडबा, पंकज फाले यांनाही गौरवण्यात आले. तसेच सिंगापूर ते लंडन सायकल प्रवास करत दापोलीत पोहोचलेले टॉम व जुलिया यांनीही स्पर्धकांसोबत सायकल चालवत त्यांचे अनुभव कथन केले. Dapoli Summer Cyclothon

Dapoli Summer Cyclothon

या सायक्लोथॉनच्या निमित्ताने दापोलीचे सौंदर्य कुटुंबासह पाहता आल्यामुळे बाहेरगावाहून आलेले सर्व रायडर खुश होते. अनेकांनी २ ते ६ दिवस मुक्काम करुन स्थानिक वस्तूंची खरेदी केली. सायक्लोथॉनसाठी प्रमुख अतिथी नगराध्यक्षा ममता मोरे, दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या डॉ जतकर व टीम, दापोली तालुका आरोग्य अधिकारी डॉ मारकड व टीम, दापोली पोलीस टीम, राहुल मंडलिक इत्यादी अनेक मान्यवर स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते. मार्गावर ठिकठिकाणी ग्रामस्थांतर्फे सायकल स्पर्धकांचे स्वागत, पाहुणचार करण्यात आला. या सायक्लोथॉन स्पर्धेचे नियोजन करण्यात अंबरीश गुरव, प्रशांत पालवणकर, अजय मोरे, राजेशकुमार कदम, रागिणी रिसबूड इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली. Dapoli Summer Cyclothon

Tags: CyclothonDapoli Summer CyclothonGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share44SendTweet28
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.