जिल्ह्यासाठी ६ हजार क्विंटल बियाणे आणि १४ हजार टन खताची मागणी
रत्नागिरी, ता. 26 : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना भात बियाणे तसेच खताची वेळेवर उपलब्धता व्हावी, यासाठी कृषी विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी सहा हजार क्विंटल भात बियाणे तसेच १४,६४१ टन खताची मागणी करण्यात आली आहे. Demand of seeds for kharif season
खते व बियाण्यांअभावी शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी कृषी विभागाकडून खते व बियाण्यांची मागणी दोन महिने आधीच करण्यात आली आहे. जिल्ह्यात ७०,५७२ हेक्टर क्षेत्रावर भात, १०,२३६ हेक्टर क्षेत्रावर नागली, ७३७ हेक्टर क्षेत्रावर तृणधान्य व ५५३.९ हेक्टर क्षेत्रावर कडधान्यांची लागवड करण्यात येते. त्यासाठी युरिया, संयुक्त, एसएसपी, एमओपी, डीएपी या खतांची मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने खताचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. Demand of seeds for kharif season
खताची विक्री ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. जिल्ह्यात मान्यताप्राप्त ३५० खत विक्रेते असून, पॉस मशिनधारक २००, तर उर्वरित १५० शेतकरी मोबाइल ॲपद्वारे खत विक्री करतात. शेतकऱ्यांना खतांचा वेळेवर पुरवठा व्हावा, वितरणात कोणताही गैरव्यवहार होऊ नये, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर भरारी पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. Demand of seeds for kharif season
खताचा प्रकार व नोंदवलेली मागणी (टनामध्ये)
युरिया – ७६००
संयुक्त – ४६००
एसएसपी – ९००
एमओपी – ३००
डीएपी – ६००