तालुकाध्यक्ष आरेकरांच्या प्रयत्नांना यश, 13 कामांना मिळाला निधी
गुहागर, ता. 9 : गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुचविलेल्या कामांपैकी 13 कामे मंजूर झाली आहेत. या कामांना जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 73 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांनी आज दिली. सदर कामे मंजुर केल्याबद्दल आरेकर यांनी खासदार सुनील तटकरे यांचे आभार मानले आहेत.
The Guhagar Taluka Nationalist Congress Party suggested 13 Development Proposals have been approved. Rs. 73 Lakhs sanctioned by District Planning Commission. Rajendra Arekar President of Guhagar Taluka Nationalist Congress Party Said, these proposals are sanctioned due to contribution of MP Sunil Takare.
गुहागर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खासदार सुनील तटकरे यांच्याकडे विकास कामांचे प्रस्ताव पाठवले होते. त्यापैकी 13 कामांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये जिल्हा वाषिर्क साकव दुरुस्ती योजनेमधुन पालशेत घुरटवाडी येथे साकव बांधण्यासाठी 15 लाख रुपये मंजुर झाले आहेत. जिल्हा नियोजनमधुन चिखली स्वामी समर्थ मठ ते मुख्य आरोग्य केंद्र रस्त्याचे डांबरीकरणासाठी 5 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. मुख्य आरोग्य केंद्राची इमारत झाली त्यावेळी बांधलेला हा रस्ता पूर्णपणे उखडला होता. त्यातच महामार्गाची उंची वाढल्याने महामार्गावरुन आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर उतरणे धोक्याचे बनले होते. याशिवाय कुटगिरी घाडेवाडी ते नदी रस्ता डांबरीकरण 5 लाख, तवसाळ भंडारवाडा एस. टी. स्टॅण्ड ते मुस्लिम मोहल्ला रस्ता डांबरीकरण 4 लाख, वाकी पिंपळवट ते कचरनाथ स्वामी मठ डांबरीकरण 5 लाख, त्रिशुळ साखरी पुल ते वेद्रेवाडी शाळा नं. २ रस्ता ४ लाख अशा 23 लाखाच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.
पर्यटन विकासासाठी जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत काही निधी खर्च करायचा असतो. गुहागर तालुक्यातील तवसाळ काशविंडा बीच सुशोभिकरण, वेळणेश्र्वर मंदिरासमोरील मंदिराचे सुशोभिकरण आणि पडवे गणेश मंदिर सुशोभिकरणाचे काम पर्यटन विकास अंतर्गत करावे अशी मागणी गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. त्यालाही खासदार तटकरेंच्या प्रयत्नांतून मंजुरी मिळाली आहे. तवसाळ, वेळणेश्र्वर आणि पडवे येथील या कामांसाठी प्रत्येकी 7 लाखाचा निधी जिल्हा वार्षिक नियोजनमधुन मंजूर झाला आहे.
Form Tourim Development Head, 21 lakhs sanctioned through MP Sunil Tatkare. For Velneshwar and Padave Temple Campus Development and Tavsal Beach Beautification.
जनसुविधा योजने अंतर्गत पडवे स्मशान शेड, तवसाळ आगर स्मशान शेड आणि चिंद्रावळे येथे सफळेवाडी, गावडेवाडी, गराटेवाडी या तीन वाड्यांसाठी एक स्मशान शेड बांधण्यासाठी प्रत्येकी 2 लाख 54 हजार असा निधी खासदार सुनील तटकरे यांनी मिळवून दिला आहे. अशी माहिती तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांनी दिली.