रत्नागिरी, ता. 19 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ८५ वर्षांवरील ज्येष्ठ मतदारांमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. या वयोगटातील एकूण मतदारांच्या तुलनेत महिला मतदार ६२ टक्के असून पुरुष मतदार ३८ टक्के आहेत. तर एकूण मतदारांच्या तुलनेत ज्येष्ठ महिला मतदारांची संख्या १.१३ टक्के आहे. Women outnumber men among voters
या मतदारसंघात ८५ वर्षांवरील ज्येष्ठ मतदारांची एकूण संख्या २६,१८१ आहे. यात महिलांची संख्या १६,३१९ तर पुरुष ९,८६२ आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ४० वयोगटापासून पुढे सर्वच सामान्य महिला मतदारांची आकडेवारी पुरुष मतदारांपेक्षा अधिक आहे. एकूण १४ लाख ३८ हजार ४७१ मतदारांपैकी पुरुष मतदार ७ लाख ८ हजार ४८७ तर महिला मतदार ७ लाख २९ हजार ९७३ आहेत. परंतु ८५ वर्षांवरील वयोगटातही महिलांची संख्या अधिक आहे. या गटातील मतदारांची एकूण संख्या २६,१८१ आहे. यात महिलांची संख्या १६,३१९ असून पुरूष मतदार ९,८६२ आहेत. Women outnumber men among voters
म्हणजेच ८५ वर्षांवरील महिलांची संख्या तब्बल ६२ टक्के तर पुरुष मतदार केवळ ३८ टक्के इतके आहे. एकूण १४ लाख ३८ हजार ४७१ मतदारांच्या तुलनेत ८५ वर्षांवरील महिलांची संख्या १.१३ टक्के तर पुरुषांची संख्या ०.६ टक्के इतकी आहे. एकंदरीत ही आकडेवारी पाहता पुरुषांपेक्षा महिलांचे आयुर्मान अधिक वाढलेले असल्याचे दिसून येते. ४० वर्षांवरील वयोगटातील महिलांचीही संख्या पुरुषांच्या तुलनेने अधिक असल्याचे दिसते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातही ८५ वर्षांवरील महिला मतदार पुरुषांच्या तुलनेत अधिक आहेत. त्याचप्रमाणे एकूण मतदारांच्या तुलनेत या महिला मतदारांची संख्या १.१३ टक्के तर पुरुषांची संख्या ०.६ टक्के आहे. Women outnumber men among voters