वेलदूर नवानगर मराठी शाळेत मतदार रॅली
गुहागर, ता. 19 : जिल्हा परिषद पूर्ण प्रा. मराठी शाळा वेलदूर नवानगर शाळेमध्ये केंद्रप्रमुख आरोही शिगवण व मुख्याध्यापक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान व पालक सभेतून मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. Voting awareness
त्यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर कोळथरकर,. सामाजिक कार्यकर्ते सुदामजी कोळथरकर, शासनमान्य सांस्कृतिक कलावंत उदय रोहीलकर, शासनमान्य सांस्कृतिक कलावंत विठोबा दाभोळकर, मुख्याध्यापक मनोज पाटील, सामाजिक कार्यकर्ते रामदास रोहीलकर, श्री नयन रोहीलकर, महेश रोहीलकर, प्रशांत हरसकर, अंगणवाडी सेविका मत्स्यगंधा कोळथरकर, सोनिया नाटेकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या प्रिया रोहीलकर, रीना खडपकर, वंशिका आंबेरकर, जानवी हरसकर, गीता वरवटकर, विद्या रोहीलकर, विशाखा रोहीलकर, सुवर्णा कोळथरकर, अंजली मुद्दमवार, सोनाली खडपे, परीक्षित दाभोळकर, अंकिता कोळथरकर आदी मान्यवर व सर्व विद्यार्थी, युवा वर्ग व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. Voting awareness
पालक सभेमध्ये मुख्याध्यापक मनोज पाटील, अंजली मुद्दमवार यांनी मतदान विषयक जनजागृती केली. आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन केले. त्यावेळी गावामध्ये मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. समुद्रकिनारी भागातील परिसराची स्वच्छता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख आरोही शिगवण., मुख्याध्यापक मनोज पाटील व ग्रामस्थ, सर्व शिक्षक यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली मुद्दमवार यांनी केले. Voting awareness