श्री हसलाई देवी देवस्थान खालचीवाडी ग्रामस्थ मंडळ
गुहागर, ता. 17 : तालुक्यातील वरवेली येथील श्री हसलाई देवी, खालचीवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने श्री हसलाई देवी मंदिरामध्ये श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमानिमित्त खालचीवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नमन कलाकारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. Honor by Naman artists
या सत्कार कार्यक्रमांमध्ये जगन्नाथ गणपत शिंदे, रमेश जानू आगरे, किसन जानू आगरे, सुरेश सिताराम शिदे, दत्ताराम विठ्ठल शिंदे, रघुनाथ शिवराम शिंदे, संतोष रामचंद्र शिंदे, सुधाकर गोपाळ शिंदे, विनोद गणपत शिंदे, महादेव यशवंत अवेरे, दत्ताराम यशवंत अवेरे, शांताराम यशवंत अवेरे, बबन शिवराम अवेरे, अशोक सोनू अवेरे, सुधाकर रामचंद्र गावडे, मधुकर गोविंद गावडे, सुभाष सखाराम अवेरे, सुहास किसन अवेरे, संतोष सोनू अवेरे, हरिश्चंद्र किसन अवेरे, अनंत यशवंत शिंदे, शिवाजी गणू हुमणे, केशव शिवराम अवेरे, चंद्रकांत शिवराम अवेरे, सुधाकर धोंडू अवेरे, वसंत रामचंद्र आगरे, रामचंद्र यशवंत आगरे, गणपत धाकू आगरे, वसंत सोनू आगरे, सिताराम सखाराम आगरे, तुकाराम शंकर आगरे, अशोक धाकू आगरे, रविंद्र रामचंद्र आगरे, प्रकाश बबन रावणंग, मुकुंद सोनू रावणंग, नारायण गोविंद भुवड, काशिराम महादेव भुवड, अर्जुन यशवंत भुवड, दत्ताराम रामचंद्र भुवड, शंकर रामचंद्र भुवड, राजेंद्र महादेव भुवड, रमेश भिकाजी भुवड, वसंत भिकाजी भुवड, अरुण महादेव भुवड, दत्ताराम भिकाजी आगरे, जयंत रामचंद्र भुवड, सुरेश शिवराम आगरे, दत्ताराम तेलगडे, काशीराम गणपत अवेरे, दत्ताराम गुणाजी घाणेकर, सुभाष पांडुरंग गुरव , सुनिल अनंत शिंदे, सुनिल दत्ताराम भुवड, प्रकाश धर्माजी आगरे, नामदेव सखाराम अवेरे, नामदेव यशवंत राणे आदी कलाकारांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. Honor by Naman artists
यावेळी बोलताना जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले की, वरवेली खालचीवाडी नमन मंडळामध्ये अनेक वर्ष कलाकार नमन कला सादर करत आहेत. परंतु शासनाकडून मिळणाऱ्या कलाकार मानधनापासून वंचित आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून यातील अनेक कलाकारांना शासनाकडून मानधन मिळण्यासाठी उपयोग होईल. यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल अवेरे यांनी केले. सत्कार सोहळा पार पडल्यानंतर नवतरुण नमन मंडळ वरवेली खालचीवाडी येथील कलाकारांनी बहुरंगी नमन सादर केले. या कार्यक्रमासाठी श्री हसलाई देवी देवस्थान वरवेली खालचीवाडी येथील सर्व कार्यकर्त्यांनी तसेच ग्रामस्थ व महिला यांनी सहकार्य केले. Honor by Naman artists
या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर वरवेली ग्रामपंचायत सरपंच नारायण आगरे, जगन्नाथ शिंदे, पत्रकार गणेश किर्वे, पंकज बिर्जे, सत्यवान घाडे, मधूकर बारगोडे, अनिल अवेरे, वसंत पांडूरंग आगरे, नंदकुमार गावडे, अनंत महादेव आगरे, अनिल अवेरे, रमेश आगरे, संतोष अवेरे, राजेंद्र भुवड, मधुकर बारगोडे, राकेश अवेरे, दत्ताराम रावणग आदी मान्यवर उपस्थित होते. Honor by Naman artists