गुहागर, ता. 17 : तालुक्यातील आबलोली चेक नाक्यावर कोल्हापूर वरून चिपळूणला जाणारा आठ टन काळा गुळाचा ट्रक पकडून वाहतूक करणारा दोघांवर गुहागर पोलीस ठाण्यामध्ये दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Black jaggery truck caught
कोल्हापूर वरून थेट चिपळूणला जाण्याऐवजी संगमेश्वर मधून गुहागर तालुक्यात दाखल होणारा काळा गुळाचा हा ट्रक चिपळूणमध्ये विना पावती चोर मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुहागर तालुक्यामध्ये प्रशासनाच्या वतीने गस्त सुरू आहे अशा मध्येच मंगळवारी पहाटे तीन वाजता गुहागर तालुक्यातील आबलोली चेक नाक्यावर आठ टन काळा गुळ वाहतूक करणारा ट्रक गुहागर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल रवींद्र आठवले, अमोल गायकवाड पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शन खाली पकडला. Black jaggery truck caught
सदर गुळाची खरेदी पावती दाखवता आली नाही यामुळे गुहागर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन गुहागर पोलीस स्टेशन समोर उभा केला आहे. तसेच या आठ टन गुळाची रुपये 48000 तर ट्रकची रुपये दोन लाख किंमत केली असून हा मुद्देमाल ताब्यात घेतल्याची नोंद केली आहे. याप्रकरणी दारूबंदी कायदा कलम 70 अंतर्गत चालक मंजुनाथ मगदूम वय 34 राहणार कर्नाटक आणि त्याचा साथीदार विकास शिवलकर वय 35 रत्नागिरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. Black jaggery truck caught