संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 16 : महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी मान्यताप्राप्त लोकशिक्षण मंडळ आबलोली संचलित, विद्यार्थी वसतिगृह आबलोली तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी या वसतिगृहामध्ये सन २०२४ – २०२५ या शैक्षणिक वर्षात इ.५ वी ते इ.१२ वी पर्यंतच्या गरीब, हुशार, गरजू व होतकरू मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश घेण्यासाठी आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. चंद्रकांत धोंडू बाईत व अधीक्षक श्री. राकेश रमाकांत साळवी यांनी केले आहे. Free admission to Abaloli Hostel
आरक्षणाप्रमाणे वसतीगृहामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या व विमुक्त जमाती, विशेष मागास वर्ग, आर्थिक मागास वर्ग तसेच अपंग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. तरी सदर प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा. Free admission to Abaloli Hostel
सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जासह दोन पासपोर्ट साईज फोटो, मुलकी अधिकाऱ्यांचे जातीचे प्रमाणपत्र, पालकांचा उत्पन्नाचा दाखला, विद्यार्थ्यांचा रहिवासी दाखला, आधार कार्ड झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स, मागील इयत्ता उत्तीर्ण झाल्याच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत व बँक पासबुक झेरॉक्स इत्यादी कागदपत्रांसह पालकांन सोबत येऊन आपला प्रवेश निश्चित करावा. प्रवेश मर्यादित असल्याने प्रवेशासाठी अधीक्षक श्री. राकेश रमाकांत साळवी मोबाईल नंबर ९४०५०७१५३१ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. चंद्रकांत धोंडू बाईत यांनी केले आहे. Free admission to Abaloli Hostel