पंचायत समितीकडून ग्रामपंचायतींचे कौतुक
गुहागर, ता. 13 : सन 2024-25 या नव्या आर्थिक वर्षात घरपट्टी वसुलीत गुहागर तालुक्यातील 66 पैकी खामशेत व पालकोट त्रिशूळ या ग्रामपंचायतींनी सर्वाधिक वसुली केली आहे. या दोन्ही ग्रामपंचायतींचे गुहागर पंचायत समितीच्यावतीने कौतुक करण्यात आले. Big issue of house tax collection
ग्रामीण भागात घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीचा मोठा प्रश्न उभा राहतो. काही गावांमध्ये पाणीपट्टी, घरपट्टी वर्षानुवर्षे थकीत असते. वसुलीसाठी सातत्याने ग्रा.पं. कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांच्या घरी हेलपाटे मारावे लागतात. काही गावांमध्ये तर पाणीपट्टी न भरल्याने योजना बंद पडल्यासारखी स्थिती आहे. असे असताना काही मोजक्याच ग्रामपंचायती नव्या वर्षाचे एक ध्येय घेऊन वसुलीची मोहिम सर्वांना बरोबर घेऊन राबवत असतात. यामध्ये गुहागर तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींचे विशेष कौतुक. Big issue of house tax collection
खामशेत ग्रामपंचायतीमध्ये 23 जानेवारी 2024 रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये सन 2024-25 या आर्थिक वर्षाची घरपट्टी व पाणीपट्टी 1 एप्रिल 2024 रोजी आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी भरण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला व त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती. त्याप्रमाणे 01 एप्रिल रोजी 294 लाभार्थ्यांची 4 लाख 35 हजार 880 रुपयेप्रमाणे 100 टक्के पाणीपट्टी भरण्यात आली. तसेच ४ लाख ५७ हजार ६८९ रुपयेप्रमाणे 100 टक्के याच तारखेला
भरण्यात आली. खामशेत अंतर्गत पारदळेवाडी व खामशेत या दोन्ही महसूल गावातील लहान मोठया 11 वाड्यांच्या ग्रामीण अध्यक्ष, मुंबई अध्यक्ष, महिला अध्यक्ष व वाड्यांमधील जबाबदार नागरिकांनी तत्पर राहून प्रत्येक वाडीतून योग्य ते नियोजन करून चांगल्या पद्धतीने सहकार्य केल्याबद्दल सरपंच मंगेश सोलकर व सदस्य, ग्रामसेवक यांनी सर्वांचे आभार मानले. Big issue of house tax collection
तालुक्यातील पालकोट त्रिशूळ या ग्रामपंचायतीनेही अशाच पध्दतीने प्रस्ताव ठेवला होता. याला प्रतिसाद देऊन सन 2024-25 या आर्थिक वर्षात 80 हजार 321 रुपये इतकी घरपट्टी भरुन ग्रा.पं.ला सहकार्य केले. याबद्दल सरपंच रविंद्र वेद्रे, सर्व सदस्य व ग्रामसेवक यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. Big issue of house tax collection