वाढत्या अपघातांनी वाहनचालक त्रस्त, रात्रीचा प्रवास करणे झाले धोकादायक
गुहागर, ता. 10 : रात्रीच्यावेळी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना रात्री-अपरात्री वन्य प्राण्यांच्या मुक्त संचाराने प्रवास करणे धोकादायक झाले आहे. अचानक वन्य प्राणी रस्त्यावर येणे, वाहनांना अचानक ब्रेक लावणे यामुळे हे अपघात होत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे असून वाढते अपघात सध्या डोकेदुखी बनत चालल्याचे त्यांनी सांगितले. Accidents due to wild animals
कडक उन्हाळ्यामुळे केवळ माणसांनाच नव्हे तर वन्य प्राणीदेखील कासावीस झाले आहेत. माणसांच्या व वाहनांच्या रहदारीमुळे वन्य प्राण्यांना पाणवठ्याच्या शोधात काळोख पडल्यानंतर फिरावे लागते. रस्ता ओलांडणे, एखाद्या अवघड वळणार कळपाने येणे आणि त्यामुळे वाहनचालकाला वळणामुळे वाहनाच्या दिव्यावर लगेच समोरील काहीही न दिसणे त्यामुळे रात्रीच्यावेळी वेगाने असणाऱ्या वाहनचालकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. Accidents due to wild animals
नुकताच असाच एक अपघात शृंगारतळीजवळील पालपेणे फाटयाजवळ रात्री ८ वाजताच्या सुमारास घड़ून आला. येथील आँटो रिक्षाचालक विजय महाडिक हे आपल्या पालपेणे गावाकडे जात असताना अचानक आलेली डुकरांची एक झुंबड त्यांच्या गाडीवर आदळली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्वरीत त्यांना डेरवण येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. दरम्यान, अलिकडे शृंगारतळी परिसरात यापूर्वी एका दिवसात ६ अपघात घडले होते. यामध्ये अनेकजण गंभीर जखमी झाले असून वाहनचालकांनी आपल्या वाहनांने नियंत्रण ठेवावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. Accidents due to wild animals