गुहागर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार
गुहागर, ता. 10 : शहरांतील शिवराम प्लाझा सोसायटी ते व्याडेश्वर मंदीर पर्यंत सांडपाण्याची अनधिकृत पाईप लाईन टाकण्यात आली आहे. यामुळे व्यापारी संतप्त झाले असून गुहागर नगरपंचायतने जर परवानगी दिली नसेल तर ती सांडपाण्याची पाईपलाईन त्वरित काढण्यात यावी, अशा तक्रारीचे निवेदन गुहागर नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहे. Complaints about sewage pipelines
या निवेदनात गुहागर एस. टी. स्टॅन्ड समोरील शिवराम प्लाझा सोसायटी पासुन ते व्याडेश्वर मंदीर पर्यंत सांडपाण्याची अनधीकृत पाईप लाईन सोडण्यात आली आहे. सदरील सांडपाणी वाहिनीची नगर पंचायतीकडे कोणती परवानगी घेतली आहे का? घेतली असल्यास आम्हाला त्याची लेखी माहीती मिळावी. परवानगी नसल्यास ताबडतोब पाईपलाईन काढून टाकण्यात यावी. शिवराम प्लामा ते गुहागर – विजापुर मुख्य रस्त्या पर्यंत नगर पंचायत ताब्यात असलेला डांबरी रस्ता खोदकाम करून पाईप लाईन टाकण्यात आली आहे. चांगल्या स्थितीत असलेला रस्ता खोदण्यात आला आहे. ही पण आपण परवानगी दिली आहेत का? याचे उत्तर आम्हास लेखी स्वरुरात देण्यात यावे. तसेच जे सांडपाणी सोडण्यात येणार आहे, तिथे आमच्या व्यापाऱ्यांपैकी काही व्यापाऱ्यांचे खाद्य पदार्थाचा व्यवसाय आहेत. तिथे दुकानाच्या बाजूला सांडपाणी सोडले तर आमच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. सदरील सांडपाण्याला दुर्गंधी आहे. तसेच सांडपाण्यामुळे डांसाचे प्रमाण वाढून डेंग्यु, मलेरिया यासारखे साथीचे आजार पसरून आरोग्य धोक्यात येईल, असे म्हटले आहे. या निवेदनावर सुचित दत्तात्रय झगडे, नूतन भोजने, विनायक देवळेकर, स्वप्निल झगडे, मंदार लोखंडे, नरेश पवार, श्रीकृष्ण रहाटे, वृंदा शिंदे, आरेकर, शंकर लाल पटेल, संदेश बोले, अभिजीत भोसले, नितीन तवसालकर, संजय झगडे, ज्ञानोबा फडतरे, संजय घुमे, योगेश कदम आदीच्या सह्या आहेत. Complaints about sewage pipelines
गुहागरवासिय व व्यापारी यांचा दि.२६ मार्च रोजी तक्रारी अर्ज आल्यानंतर दि.२८ मार्च रोजी गुहागर नगरपंचायतने शिवराम प्लाझा गृहनिर्माण सोसायटीला सांडपाणी उघड्यावर सोडल्याबाबत नोटीस दिली आहे. या नोटीसीमध्ये म्हटले आहे की, आपल्या सोसायटीचे सांडपाणी हे नगरपंचायतीची पूर्व परवानगी न घेत नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या पावसाचे सांडपाणी वाहून जाणा-या नाल्यामध्ये पाईपद्ववारे आणले असून सदरील सोसायटीमध्ये असलेल्या मालमत्ताधरकांचे सांडपाणी हे आपण आपल्या सोसायटी मध्ये शोषखड्डा बांधून त्या मध्ये जिरविणे अपेक्षित आहे. तसे न करता आपण सदरील सोसायटीचे सांडपाणी हे नाल्यामध्ये आणुन सोडले आहे. त्यामुळे सदरील परिसरातील नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होवू शकतो, तरी सुरु असलेले काम ताबडतोब बंद करावयास सांगितले असूनही आपण सदरील काम सुरु ठेवले आहे. तरी सदरील काम त्वरीत बंद करुन सदरील नाल्याला आपले सोसायटीचे पाणी सोडू नये. तसे न केल्यास आपणावर महाराष्ट्र नगरपरिषदा नरपपंचायत व औदयोगिक नगरी अधिनियम १९६५ कलम २३० अन्वये आपणावर कायदेशिर व दंडात्मक कार्यवाही करणेत येईल याची नोंद घ्यावी. Complaints about sewage pipelines