श्री सुकाई देवी व श्री झोलाई देवीचा शिमगोत्सव
गुहागर, ता. 08 : तालुक्यातील तळवली गावची ग्रामदेवता श्री सुकाई देवी व पेवे गावची ग्रामदेवता श्री झोलाई देवीचा शिमगोत्सव सध्या मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दोन बहिणींचा पालखी भेट सोहळा नुकताच तळवली ग्रामदेवता सहाण येथे मोठ्या उत्साहात पार पडला. Palkhi meeting ceremony
यावेळी पेवे गावची ग्रामदेवता श्री झोलाई देवीची पालखी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत नाचवत तळवली सहाण येथे आणण्यात आली. तर तळवली ग्रामदेवता श्री सुकाई देवीची पालखी आपल्या बहिणीच्या स्वागताला नाचवत आणण्यात आली. यानंतर दोन्ही पालख्या नाचवण्याचा कार्यक्रम पार पडला. तसेच यावेळी दोन्ही पालख्यांचा नयनरम्य भेटीचा सोहळा पार पडला.हा भेटीचा सोहळा पाहण्यासाठी विविध ठिकाणाहून भाविक आले होते. या दोन बहिणींची भेट प्रसिद्ध असून यावेळी दोन्ही पालख्यामधील नारळाची अदलाबदल होते. अशी आख्यायिका पूर्वजांकडून सांगितली जाते. यावर्षी देखील मोठ्या उत्साही वातावरणात नियोजनबद्ध हा पालखी भेट सोहळा पार पडला. या अनोख्या पालखी भेट सोहळ्यासाठी विविध ठिकाणाहून भाविक उपस्थित होते. यावेळी तळवली गावाला जणू जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. Palkhi meeting ceremony