ग्रामस्थांच्या आरोपाला उपअभियंता यांनी दिले उत्तर
गुहागर, ता. 06 : तालुक्यातील अंजनवेल मधील सार्वजनिक शौचालयाची कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत. यामुळे जे मुल्यांकन केले गेले ते चालू मुल्यांकन होते. अंतिम मुल्यांकनामध्ये योग्य ती सुधारणा केली जाते. यामुळे या कामामध्ये कोणताही अपहार झाला नसल्याचे उत्तर ग्रामिण पाणी पुरवठा उप उभियंता यांनी दिले आहे. Sub-Engineer’s reply to villagers
गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील माजी सरपंच यशवंत बाईत यांनी अंजनवेल बोरभाटलेवाडी येथे पत्रकार परिषद घेऊन अंजनवेलमधील कातळवाडीतर्फे अंजनवेल येथील शौचालय दुरूस्तीच्या कामात अपहार झाल्याचा आरोप करत सरपंच, ठेकेदार, उपअभियंता, ग्रामसेवक यांनी संगनमताने निधीची लूट केली असल्याचे म्हटले होते. मात्र याप्रकरणी मुल्यांकन करणारे उपअभियंता यांनी या कामामध्ये जर अंतिम मुल्यांकन झाले नाही, तर अपहार होण्याचा प्रश्नच येत नसल्याचे म्हटले आहे. Sub-Engineer’s reply to villagers
त्यांनी माहीती देताना, अंजनवेल ग्रामपंचायतीने १५ वा वित्त आयोगाच्या सन २०२१-२२ च्या आराखडयात बंदीत निधीतून कातळवाडीतर्फे अंजनवेल येथील शौचालय दुरूस्तीसाठी सुमारे ३ लाख ५७ हजार रूपये व मौजे अंजनवेल येथील शौचालय दुरूस्तीसाठी ३ लाख ५९ हजार रूपयांची तरतुद केली होती. सदर दोन्ही कामे आजही पूर्ण झालेली नाहीत. जरी सरपंचांनी अंतिम मुल्यांकन करण्याचे पत्र दिले असले तरी आपल्या विभागामार्फत सदर कामाची पहाणी करून चालू मुल्यांकन करण्यात आले. यामध्ये कातळवाडीतर्फे अंजनवेल येथील शौचालयाचे मुल्यांकन करताना बेरजेमध्ये काही त्रुटी असल्या तरी सदर कामाचे अंतिम मुल्यांकन करताना यामध्ये योग्य ती सुधारणा करण्यात येईल. अजूनही अंदाजपत्रकानुसार सदर कामच पूर्ण झालेले नाही. कामामध्ये शौचालयाचे छप्पर सीमेंट पत्रे घेतले असून त्याप्रमाणे त्याचा दर मुल्यांकनामध्ये धरण्यात आलेला आहे. यामुळे जोपर्यंत अंतिम मुल्यांकन होत नाही. तोपर्यंत यामध्ये अपहार झाला असे म्हणताच येणार नाही. असे ग्रामिण पाणी पुरवठा उपअभियंता यांनी उत्तर देताना सांगितले. यामुळे अंजनवेलमधील सार्वजनिक शौचालय अपहार झाल्याचा आरोपाचे पूर्णपणे खंडन केले आहे. Sub-Engineer’s reply to villagers