पिंपर मठवाडी येथील घटना
गुहागर, ता. 06 : वीजवाहिनीवरुन आकडा टाकून नदीच्या पाण्यात विद्युत प्रवाहाने मासेमारी करणाऱ्या तरुणाचा वीजेच्या धक्क्याने काल शुक्रवारी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास मृत्यू झाल्याची घटना घडली. गुहागर तालुक्यातील पिंपर मराठवाडी येथील संदेश लक्ष्मण दवंडे (वय 45, रा. पिंपर सहाणवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. Youth dies due to electrocution
पिंपर सहाणवाडी येथील संदेश दवंडे व त्याचा सहकारी मुकेश दवंडे हे दोघे पिंपर मराठवाडी येथील गणपती विसर्जन घाट येथील नदीत मासेमारीसाठी गेले होते. यावेळी मुकेश दवंडे याने नदीच्या जवळून गेलेल्या वीजवाहिनीवर वायरने आकडा टाकला. याच दरम्यान, संदेश याने वीजेच्या प्रवाहाने नदीत मासेमारी सुरु केली. यावेळी वीजेचा धक्का लागून संदेश दवंडे याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी गुहागर पोलिस निरीक्षक सचिन सावंत व सहकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला. अधिक तपास पो.नि. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार विशाल वायंगणकर करत आहेत. दरम्यान, संदेश दवंडे हा गवंडी काम करायचा. त्याच्या मृत्यूने पिंपर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. Youth dies due to electrocution