• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 October 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विविध परवानग्यांसाठी ‘सुविधा पोर्टल’ वापरा

by Guhagar News
April 3, 2024
in Ratnagiri
66 1
1
131
SHARES
373
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह

रत्नागिरी, ता. 03 : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार अथवा पक्षीयस्तरावर प्रचारासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्यांसाठी  सुविधा पोर्टल suvidha.eci.gov.in  चा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी सर्व नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठकीत केले. Suvidha Portal’ for various permissions

माध्यम प्रमाणिकरण आणि सनियंत्रण, मतदार जनजागृती स्वीप, मनुष्यबळ, वाहने, टपाली मतपत्रिका, आचारसंहिता, इव्हीएम मशीन, मतदान केंद्र नियोजन, कायदा व सुव्यवस्था, निरिक्षकांची व्यवस्था, स्ट्राँग रुम व्यवस्था, दिव्यांग मतदार सुविधा आदींबाबत जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी सविस्तर आढावा घेतला. संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण करुन केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. Suvidha Portal’ for various permissions

उमेदवार अथवा पक्षीयस्तरावर प्रचारासाठी  आवश्यक असणाऱ्या परवानग्यांसाठी भारत निवडणूक आयोगाच्या ‘सुविधा’ या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करुन परवानगी घ्यावी. आचारसंहितेचे तंतोतंत पालन होईल, याची कटक्षाने दक्षता घ्यावी. संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी सतर्क राहून दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण कराव्यात, असेही श्री. सिंह म्हणाले. Suvidha Portal’ for various permissions

या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड आदीसह नोडल अधिकारी उपस्थित होते. Suvidha Portal’ for various permissions

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarSuvidha Portal' for various permissionsUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share52SendTweet33
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.