ओम साई संघ विजेता तर श्री हरि संघ उपविजेता
गुहागर, ता. 02 : तालुक्यातील वरवेली तेलीवाडी प्रीमियर लीगच्या वतीने अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा नुकत्याच श्री काशी विश्वेश्वर मंदिर पटांगणातील कै. संतोष वसंत किर्वे क्रीडानगरी मध्ये संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये दिलीप रसाळ यांचा ओम साई ‘अ’संघ विजेता ठरला तर अनिल किर्वे यांचा श्री हरि संघ उपविजेता ठरला. तृतीय विजेता प्रणित दशरथ किर्वे यांचा शिवराय वॉरियर्स, चतुर्थ विजेता प्रवीण किर्वे यांचा शिवशक्ती संघ विजेता ठरला. Varveli Telivadi Premier League
या स्पर्धेचे उद्घाटन तरुण उत्साही मंडळ वरवेली तेलीवाडीचे अध्यक्ष दीपक किर्वे, ज्येष्ठ कबड्डी खेळाडू नंदकुमार किर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. तर कै. संतोष वसंत किर्वे क्रीडानगरीचे उद्घाटन रमाकांत किर्वे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज हृतिक किर्वे, उत्कृष्ट गोलंदाज आकाश गणेश किर्वे, सामनावीर सुदीप रसाळ, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अनिल किर्वे आधी खेळाडूंना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. Varveli Telivadi Premier League
या कार्यक्रमासाठी शिवशक्ति मंडळ अध्यक्ष प्रवीण किर्वे, सुशांत रसाळ, सुदीप रसाळ, शैलेश किर्वे, संतोष (आवा)किर्वे, अभिजित किर्वे,अनंत रसाळ, निलेश रसाळ, मधूकर किर्वे, बळीराम पवार, चंद्रकांत किर्वे, दत्ताराम किर्वे, समीर महाडिक, संतोष किर्वे, आकाश किर्वे, विलास भाऊ किर्वे, दिलीप किर्वे, रमाकांत रसाळ, मधुकर किर्वे, संतोष रसाळ, निलेश रसाळ, अल्पेश किर्वे, प्रथमेश रहाटे, सचिन किर्वे, योगेश रसाळ, महेश किर्वे, सुदीप रसाळ, मुन्ना किर्वे, संजोग किर्वे, अल्पेश किर्वे, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष किर्वे यांनी केले. Varveli Telivadi Premier League