• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
20 October 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोल्हापूर येथे ‘लोकशाही मॅरेथॉन’चे आयोजन

by Guhagar News
March 25, 2024
in Sports
105 2
0
Democracy Marathon at Kolhapur
207
SHARES
592
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

QR कोड स्कैन करा आणि मॅरेथॉन मधे सहभागी व्हा

कोल्हापूर, ता. 25 : सार्वत्रिक लोकसभा निवडणुक सन 2024 साठी मतदार जनजागृतीच्या अनुषंगाने रविवार, दि.7 एप्रिल 2024 रोजी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून,  जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांचेतर्फे स्वीप (Systematic Voters’ Education and Electoral Participation) अंतर्गत “RUN FOR VOTE” या “लोकशाही मॅरॅथॉन” चे आयोजन करणेत आले आहे. “चला धावू या – सुदृढ आरोग्यासाठी, मतदान करूया बळकट लोकशाहीसाठी” हे या लोकशाही मॅरॅथॉनचे ब्रीद वाक्य असणार आहे. Democracy Marathon at Kolhapur

कोल्हापूर शहरामधील मतदारांनी उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारांची जन जागृती, करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.7/4/2024 रोजी जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे लोकशाही मॅरॅथॉन होणार आहे. Democracy Marathon at Kolhapur

 या लोकशाही मॅरॅथॉनमध्ये सहभागी होणा-या धावपटूंना 3 कि.मी., 5 कि.मी., 10. कि.मी. अंतराचे पर्याय उपलब्ध होणार असून या मॅरॅथॉनची सुरुवात व सांगता पोलिस परेड ग्राऊंड, कसबा बावडा, कोल्हापूर या ठिकाणी होणार आहे.  या वोट मॅरॅथॉनमध्ये कोल्हापूर शहरातील विविध शासकीय, निम शासकीय, महामंडळे, राष्ट्रियीकृत बँका व सहकारी बँका, संस्था कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, मतदार नागरिक यांनी मोठ्या संख्येने उत्सफूर्तपणे सहभागी व्हावे तसेच, जे मतदार सहभागी होऊ शकणार नाहीत त्यांनीदेखील धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. Democracy Marathon at Kolhapur

या लोकशाही मॅरॅथॉनमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे गुगल फॉर्म उपलब्ध करुन दिलेला असून दि.24/3/2024 ते 31/3/2024 या कालावधीमध्ये https://forms.gle/ZjEeU27NYRwoVQ6J9  या लिंकवरती धावपटू नि:शुल्क नोंदणी करु शकतील, असे आवाहन निलकंठ करे, नोडल अधिकारी (स्वीप) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांनी केले आहे. Democracy Marathon at Kolhapur

Tags: Democracy Marathon at KolhapurGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarRun for votesUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share83SendTweet52
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.