• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 October 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आचारसंहितेमुळे आनंदाचा शिधा उशिरा मिळणार

by Guhagar News
March 22, 2024
in Bharat
122 1
0
Ration of happiness will come late
239
SHARES
682
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आनंदाचा शिधा ७ जूनपर्यंत न वाटण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, ता. 22 : रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी आहे. राज्य मंत्रिमंडळाने गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त‘आनंदाचा शिधा’ वितरण करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे आनंदाचा शिधावाटप दोन महिने बंद राहणार आहे. आचारसंहितेमुळे वाटपास प्रतिबंध करण्यात आला आहे.  Ration of happiness will come late

राज्य सरकारने दुर्बल घटक आणि सामान्य नागरिकांना शिधावाटप दुकानाच्या माध्यमातून सण, उत्सवाच्या काळात लागणारे अत्यावश्यक साहित्य किरकोळ दराने वाटप करण्याचे धोरण अवलंबिले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आनंदाचा शिधा दोन महिने बंद राहणार आहे. त्यामुळे आता पुढील दोन महिने त्यांना आनंदाचा शिधा मिळणार नाही. दीड वर्षाच्या कालावधीत एक किलो साखर, अर्धा किलो रवा, मैदा, एक किलो तेल, चणाडाळ या वस्तूंचा संच तयार केला होता. तो शिधावाटप दुकानातून लाभार्थींना सणाच्या काळात वाटप केला जात होता. या संचासाठी १०० रुपये आकारण्यात येत होता. आता होळी, गुढीपाडवा सण जवळ आले आहेत. Ration of happiness will come late

परंतु आता आनंदाचा शिधावाटप न करण्याचा निर्णय निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतला आहे. निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशावरून लाभार्थींना शिधावाटप दुकानातून देण्यात येणारे वस्तूंचे संच आचारसंहिता संपेपर्यंत म्हणजेच ७ जूनपर्यंत वाटप न करण्याचा निर्णय शासनाने घेतला. होळी, गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा वाटप करण्याचे राज्य सरकारचे नियोजन होते. परंतु त्याला आता आचारसंहितेचा अडसर आला आहे. आनंदाच्या शिध्याचा लाभ 1 कोटी 69 लाख शिधा पत्रिकाधारकांना मिळतो. परंतु ऐन सणाच्या तोंडावरच आता त्यांना हा शिधा मिळणार नाहीये. ही योजना 2022 मध्ये सुरू करण्यात आली होती. महाराष्ट्र सरकारने आनंदाचा शिधा योजना गरीब आणि गरजू लोकांना फूड किट देण्यासाठी सुरू केली आहे. Ration of happiness will come late

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarRation of happinessRation of happiness will come lateUpdates of Guhagarआनंदाचा शिधागुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share96SendTweet60
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.