गुहागर, ता. 12 : अभियांत्रिकीच्या पदविका विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांच्यामधील नावीन्यपूर्ण कल्पकतेला चालना मिळून विज्ञानविषयक अविष्कार सादर करण्याची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयच्या (Maharishi Parashuram College of Engineering)वतीने प्रकल्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञानविषयक आविष्कार सादर करतानाच संशोधनाला चालना देणे हा या स्पर्धेचा मुख्य हेतू होता. Project competition at Velneshwar


कोकण विभागातील १० तंत्रनिकेतन मधील एकूण ३४ गटांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेचे उद्घाटन टाटा मूलभूत संशोधन केंद्रातील निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. सुधाकर आगरकर यांच्या हस्ते करण्यात आले. सृजनशीलतेचा विकास हा विकसित भारत निर्मितीमध्ये खूप महत्वाचा आहे, असे प्रतिपादन यावेळी डॉ. आगरकर यांनी केले. या प्रकल्प स्पर्धेत सहभागी प्रकल्प वर्किंग, व्हर्च्युअल मेकअप मॉडेल असे होते. इकोफ्रेंडली, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू साहित्य असेही प्रकल्प सादर झाले. सौरऊर्जेचा नाविन्यपूर्ण उपयोग, शेतीमध्ये वापरात येतील अशी आधुनिक अवजारे, प्लास्टिकचा पुनर्वापर, निसर्गपूरक घरबांधणी, आर्टीफिसिअल इंटेलिजन्स, भूजल पुनर्भरण, आधुनिक ड्रोन, रोबोट नियंत्रित वाहन, अग्निशमन दलासाठी उपयुक्त रोबोट इ. नाविन्यपूर्ण प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले. Project competition at Velneshwar


सामाजिक जीवनावर परिणाम करणाऱ्या प्रकल्पाची उपयुक्तता, सोपी हाताळणी, नावीन्यपूर्णता, कल्पकता, सादरीकरण अशा निकषांच्या आधारे परीक्षण करण्यात आले. यावेळी परीक्षक म्हणून भाभा अणुसंशोधन केंद्रातील निवृत्त शास्त्रज्ञ श्री. जयंत कयाल, डॉ. राजेंद्रकुमार कुलकर्णी व श्री. अशोककुमार यादव यांनी काम पाहिले. स्पर्धेनंतर लगेच बक्षीस वितरण समारंभ महाविद्यालयातील नाना फडणवीस सभागृहामध्ये पार पडला. पहिली दोन पारितोषिके विद्या प्रसारक मंडळाचे तंत्रनिकेतन, ठाणे यांनी पटकाविले. दिप शहाणे व गटाच्या “सौरऊर्जेवरील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था” या प्रकल्पाने १० हजार रुपये रोख प्रथम पारितोषिक, व माहेश्वरी पेडणेकर व गटाच्या “अंतरिक्ष यात्री” या प्रकल्पाने ७ हजार रुपये रोख दुसरे पारितोषिक पटकावले. सह्याद्री तंत्रनिकेतन, सावर्डेच्या अश्लेष निवटे व गटाच्या “मेन्डेज” या प्रकल्पास रोख रुपये ५ हजार चे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. यशवंतराव भोसले तंत्रनिकेतन, सावंतवाडीच्या हर्षद चव्हाण व गटाच्या “भूजल पुनर्भरण” या प्रकल्पाने रोख रुपये २ हजारांचे उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. समारंभाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र सोनी यांनी सर्व स्पर्धकांच्या प्रकल्पांचेकौतुक केले. Project competition at Velneshwar
प्रकल्प स्पर्धेच्या आयोजनासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, प्राचार्य डॉ. नरेंद्र सोनी, उपप्राचार्य प्रा. अविनाश पवार, कार्यालय प्रमुख श्री. हृषीकेश गोखले व सर्व विभागप्रमुख यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेच्या आयोजनामध्ये प्रा. हृषीकेश भावे, प्रा. योगेश काटदरे, प्रा. मंदार पावरी, प्रा. गौरी जोशी, प्रा. राधिका कदम, प्रा. गौरी दांडेकर व श्री. संजीव रहाटे यांनी विशेष मेहनत घेतली. Project competition at Velneshwar