भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या हस्ते
गुहागर, ता. 11 : गुहागर असगोली वरचीवाडी येथे जाणाऱ्या रस्त्याला संरक्षण भिंतीच्या कामाची मागणी असगोली ग्रामस्थांनी माजी आमदार विनय नातू यांच्याकडे केली होती. या मागणीला डॉ. नातू आणि तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी पाठपुरावा करून २५ / १५ लेखाशिर्षाखाली रुपये ५ लाखाचा निधी मंजूर करुन आज या कामाचे भूमिपूजन भाजपा तालुकाध्यक्ष निलेश विश्वनाथ सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. Bhoomipujan of protection wall
यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधतांना निलेश सुर्वे म्हणाले कि, असगोली गाव हा नेहमीच भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी ठामपणे उभे राहीलेला आहे. मध्यंतरीचा काळ सोडला तर नातूसाहेबांच्या माध्यमातून गावामध्ये अनेक विकासकामे पुर्ण झाली आहेत. यापुढे आता विकासकामांबाबत आपण निश्चींत रहा. ग्रामपंचायतीमध्ये विविध लेखाशिर्षाखाली आपण अभ्यास पुर्वक आराखडा तयार केला पाहीजे. आज मी जिल्हा नियोजन कमिटीचा सदस्य आहे. आपली कामे आराखडयामध्ये असतील तर त्याला निधी मंजूर करण्यास अडचण निर्माण होत नाही. या संरक्षण भिंतीच्या उर्वरित कामासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासित करतो.” असे ते म्हणाले. Bhoomipujan of protection wall
यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या योजना, पर्यटन व्यवसाय आणि असगोली या विषयांवर सुध्दा ग्रामस्थांना निलेश सुर्वे यांनी मार्गदर्शन केले. असगोली हे गाव समुद्र किनारी वसलेले आहे. सर्वाधिक मच्छिमारी हा व्यवसाय आहे. मात्र आपण आजही पारंपारिक पध्दतीने व्यवसाय करतो. माशांवर प्रक्रिया करुन त्यातून अर्थाजनाचे शिक्षण घेणे गरजेचे आहे. पर्यटनाच्या दृष्टिने असगोली गाव हे फार महत्वाचे आहे. याचाही आपण युवकांनी अभ्यास करणे गरजेचे आहे. बचत गटाच्या माध्यमातून शासनाने अनेक योजना महिलांसाठी उभ्या केल्या आहेत. मात्र आपण याचा लाभ घेण्यास कमी पडतो. कामगार योजना, जनधन योजना, पिएम किसान योजना, विश्वकर्मा योजना आदि अनेक योजनांचा लाभ घेणे गरजेचे आहे. यासाठी आपल्याला पक्षाच्या माध्यमातून योग्य ते मार्गदशन मिळेल मात्र आपण एक पाऊल पुढे येऊन याचा लाभ आपण घेतला पाहीजे. देशामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक, आरोग्य विषयक, तरुणांना रोजगार सुलभ कर्ज व्यवस्था अशा विविध योजनांच्या माध्यमातून देशाला सक्षम करण्याचे काम आज मोदी साहेब करत आहेत. याचा आपण लाभ घेतला पाहीजे असे आवाहन त्यांनी केले. Bhoomipujan of protection wall
गुहागर विधानसभा मतदार संघामध्ये ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत, माजी आमदार विनय नातू, जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्या प्रयत्नाने गुहागर विधानसभा मतदार संघासाठी १ कोटी रुपयांचा निधि मंजूर करण्यात आला आहे. त्यातील या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी असगोली सरपंच सौ. छायाताई कटनाक, उपसरपंच प्रदिप घुमे, भाजपा तालुका सरचिटणिस सचिन ओक, गुहागर शहर सरचिटणिस संतोष सांगळे, ओबीसी अध्यक्ष साईनाथ कळझुणकर, माजी सभापती दिप्ती असगोलकर, एकतावर्धक मित्र मंडळाचे सेक्रेटरी महेश डिंगणकर, मुंबई मंडळाचे अध्यक्ष संजय घुमे, महिला मंडळ अध्यक्षा वृषाली घुमे, ग्रा.प. सदस्य प्रकाश तांबे, केशव घुमे, मुंबई पदाधिकारी हर्षद घाणेकर, संदेश घाणेकर, संदिप घुमे व ग्रामस्थ सुभाष घुमे, प्रविण घुमे, पत्रकार संतोष घुमे व महिला मंडळ मोठ्या संख्यने यावेळी उपस्थित होते. एकता वर्धक मित्र मंडळ यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे आभार सेक्रेटरी महेश डिंगणकर यांनी मानले. Bhoomipujan of protection wall