गुहागर, ता. 08 : कोकणातील प्रसिद्ध श्री देव व्याडेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. त्यानिमित्ताने आज सकाळपासून धार्मिक कार्यक्रमांबरोबर सुस्वर भजने सादर केली जात आहेत. Crowd of devotees to see Vyadeshwar

महाशिवरात्री उत्सवनिमित्त सकाळी ७ ते 9.30 वा. श्रींची षोडशोपचारे पुजा व लघुरुद्र, दु. 12 वा. महाआरती करण्यात आली. दु. 2 ते 7 वा. सुस्वर भजने, रात्रौ 8.30 ते 9.30 वा. श्री देव व्याडेश्वर दिंडी सेवा मंडळ चिखली यांचे वारकरी कीर्तन, रात्रौ 10 वा. ढोल पथक, टाळ मृदुंगाच्या गजरात श्रींची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच सोमवार दि. 11 मार्च 2024 रोजी सकाळी 8 वा. रुद्र याग हे कार्यक्रा करण्यात येणार आहेत.

तर शनिवार 9 ते सोमवार 11 असे तीन दिवस संध्या 6 ते 10 या वेळेत पोलीस परेड मैदानावर श्री व्याडेश्वर महाशिवरात्री महोत्सवानिमित्त रेकॉर्ड डान्स, पालखी नृत्य, जाखडी नृत्य, दांडीया, आर्केस्ट्रा, मंगळागौर, जादुचे प्रयोग, नमन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सर्वांसाठी विविध करमणूकीचे कार्यक्रम, विविध शाकाहारी पदार्थाचे स्टॉल, विविध वस्तूचे स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी खिचडी प्रसाद देण्यात येत होते. Crowd of devotees to see Vyadeshwar

