गुहागर, ता. 08 : स्वयंप्रकाश गोयथळे व मोरे मंडळ गुहागर खालचा पाट यांच्या वतीने रविवार दिनांक 10 मार्च 2024 रोजी अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. Cricket tournament at Khalchapat

या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघाला 2 हजार दोन व आकर्षक चषक, तर उपविजेत्या संघाला एक हजार एक व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी गुहागर खालचापाट येथील मैदानावर होणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेचे क्रीडा रसिकांनी आनंद लुटावा व जास्त संघाने सहभागी व्हावे असे आवाहन यथार्थ समील मोरे, स्पर्श योगेश गोयथळे, अद्वैत महेश पडवळ, राज सुधीर नागवेकर, रुद्र गणेश पावसकर यांनी केले आहे. Cricket tournament at Khalchapat