गुहागर, ता. 04 : तालुक्यातील अंजनवेल पुलाजवळ असणार्या शादाब आचरेकर यांच्या आईस्क्रीम, थंड पेय व कटलरीच्या दुकानाला आग Shop fire in Anjanvel लागली. या आगीत त्यांच्या दोन गाळ्यातील सर्व साहित्य जळून खाक झाले. आग लागल्यानंतर विक्री साहित्य वाचविण्यचा प्रयत्न करणाऱ्या शादाब आचरेकर यांचे दोन्ही हातही भाजले आहेत. या आगीमध्ये सुमारे 5 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हाकेच्या अंतरावर असलेल्या कंपन्यांचे दोन अग्नीशामक बंब असुनही एस आकाराच्या अवघड वळणांमुळे त्यांचा काही उपयोग झाला नाही. Shop fire in Anjanvel
आगीचा थरार पहाण्यासाठी लाल रंगातील English वाक्यावर क्लिक करा.
अंजनवेल पुलाजवळ शादाब आचरेकर यांचे दोन दुकानाचे गाळे आहेत. एका गाळ्यात थंड पेय, आईस्क्रीम, कुरकुरे, वेफर्स, गोळ्या, बिस्कीटे असे अन्य खाद्य पदार्थ व नेल पॉलीश, बांगड्या, टिकल्या आदी सौंदर्य प्रसाधने असतात. तर दुसऱ्या गाळात मोबाईल ॲक्सेसरीज व रीचार्ज, लहान खेळणी, वह्या, कोरे कागद, पेने असे नित्य उपयोगात येणारे शालेय साहित्य ते विक्रीसाठी उपलब्ध असते. Shop fire in Anjanvel तीन महिन्यांपूर्वीच त्यांनी आणखी एक गाळा घेवून आपला व्यवसाय वाढवला होता.
Shop fire in Anjanvel
सोमवारी (ता. 4) दुपारी आईस्क्रीम व थंड पेये ठेवण्यासाठी दुकानात असलेल्या डि- फ्रिझरच्या कॉम्प्रेसरने पेट घेतला. कॉम्प्रेसरजवळच प्लास्टीक रॅपर असलेल्या कुरकुरे, वेफर्स आदी खाद्य पदार्थांच्या पाकीटे होती. त्यांच्यापर्यंत आग पोचल्यावर आगीचा भडका उडाला. अवघ्या काही मिनिटात आग दुकानात पसरली. त्यामुळे शादाब आचरेकरांना आगीवर नियंत्रण ठेवण्यास संधीच मिळाली नाही. दोन गाळ्यांच्या मध्ये एक दरवाजा असल्याने आग दुसऱ्या गाळातही पोचली. आगीच्या लोळांनी दोन्ही गाळ्याच्या छप्परावर घालतलेले स्टीलचे चॅनेल वितळले. भिंतींवरील प्लास्टर तडकून फुटु लागले. थंड पेयाच्या बाटल्या, सेंट व बॉडी स्प्रेच्या बाटल्या, नेल पॉलीशच्या बाटल्यांचे स्फोट होवून त्यातील उकळते द्रव पदार्थ बाहेर पडत होते. त्यामुळे आग कशी विझवायची असा प्रश्र्न ग्रामस्थांसमोर उभा होता. तरीही शेजारील नदीतून साखळी पध्दतीने बादल्यांनी पाणी आणून दुकानाच्या दोन्ही बाजुने आग विझविण्याचा प्रयत्न ग्रामस्थ करत होते. अखेरीस दोन तासांच्या सामुहिक अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात ग्रामस्थांना यश आले. परंतु तोपर्यंत दोन्ही गाळ्यातील सामान जळून खाक झाले होते.
या आगीमध्ये शादाब आचरेकर यांचे सुमारे 5 लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यांच्या दुकानाशेजारी चिकन सेंटर आहे. सुदैवाने आज चिकन सेंटरमध्ये जीवंत पक्षी नव्हते. तसेच विक्रीची वेळ संपून गेली होती. त्यामुळे चिकन सेंटरचे फार मोठे व्यावसायिक नुकसान झाले नाही. परंतु आगीमुळे चिकन सेंटरचे छप्पर, स्टीलचे सी चॅनेल, भिंती यांचे नुकसान झाले आहे. Shop fire in Anjanvel
शादाब आचरेकरांचे हात पोळले
आग नियंत्रणात आणता येणार नाही हे लक्षात आल्यावर शादाब आचरेकर यांनी दुकानातील साहित्य बाहेर काढण्यास सुरवात केली. स्टेशनरी ठेवलेल्या गाळ्यातील लाकडी कपाट, खुर्च्या, शालेय साहित्य, मोबाईल ॲक्सेसरीच असे विक्रीसाठी ठेवलेले साहित्य ते बेभान होवून बाहेर काढत होते. त्यांना ग्रामस्थही मदत करत होते. मात्र या प्रयत्नांमध्ये त्यांचे हात आगीच्या झळांनी पोळून निघाले आहेत. दोन्ही हातांवर कोपरापर्यंत फोड आले आहेत. Shop fire in Anjanvel
तीव्र वळणांचा बंबाला अडथळा
अंजनवेल गावाच्या क्षेत्रातच रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प व कोकण एलएनजी अशा दोन कंपन्या आहेत. या कंपन्यांकडे अग्नीशमन दल आहे. आगीची घटना समजताच सामाजिक दायित्व म्हणून दोन्ही कंपन्यांचे बंब व दलातील सुरक्षा रक्षक तिथपर्यंत पोचून आग विझविण्यास सहकार्य करतात. गुहागरसह दापोली व चिपळूण तालुक्यापर्यंत ते सेवा देतात. अंजनवेलमधील आगीची माहिती अग्नीशमन दलापर्यंत पोचली होती. मात्र गावातील रस्त्यावरील एस आकाराच्या तीव्र वळणामुळे अग्नीशमन दलाचा बंब घटनास्थळी पोचु शकत नव्हता. त्यामुळे दोन अग्नीशमन दले हाकेच्या अंतरावर असूनही त्यांचा उपयोग आग विझविण्यासाठी झाला नाही. Shop fire in Anjanvel