• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 July 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भाजपचा उद्या १ मार्च रोजी कार्यकर्ता मेळावा

by Guhagar News
February 29, 2024
in Old News
83 1
1
Bhumi Pujan by Minister Chavan
162
SHARES
464
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरीत मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार

रत्नागिरी, ता. 29 : लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपाने दावा केला आहे. अजून कोणालाही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. पुढील तीन दिवसांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्ष चित्राताई वाघ आणि लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी व गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत दौऱ्यावर येत आहेत. BJP workers meet in Ratnagiri

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपाच्या कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक उद्या (ता. १) होणार आहे. या वेळी अन्य पक्षांतील कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश होणार आहे. हा कार्यक्रम स्वयंवर मंगल कार्यालयात दुपारी १२.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती रत्नागिरी विधानसभा क्षेत्रप्रमुख तथा लोकसभा मतदारसंघाचे सहप्रभारी बाळ माने यांनी दिली. BJP workers meet in Ratnagiri

मंत्री चव्हाण यांचा उद्या रत्नागिरीत दौरा आहे. दुपारी २ वाजता शासकीय विश्रामगृहात सार्वजनिक बांधक मंडळ अंतर्गत कामांची बैठक, २.३० वाजता रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वे स्थानक सुशोभिकरण प्रकल्पाबाबत आढावा बैठक होणार आहे. त्यानंतर ३ वाजता जिल्ह्यातील विविध विकासकामांचे आभासी पद्धतीने भूमीपूजन व लोकार्पण कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. ४ वाजता शिक्षकांच्या विविध प्रश्न मागण्यांसंबंधी जिल्हा शिक्षक पतपेढीत मंत्री उपस्थित राहतील. BJP workers meet in Ratnagiri

चित्राताई वाघ २ मार्च रोजी रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. तसेच लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी व गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा ३ मार्च रोजी रत्नागिरीत दौरा आहे. कमळ निशाणीवरच लोकसभा निवडणूक जिंकण्याचा इरादा भाजपाने केला आहे. त्यादृष्टीने हे तीनही दौरे महत्त्वाचे मानले जात आहेत. BJP workers meet in Ratnagiri

Tags: BJP workers meet in RatnagiriGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share65SendTweet41
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.